वाडिया महाविद्यालयात युवक महोत्सव स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
वाडिया महाविद्यालयात मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरू होणाऱ्या युवक महोत्सवात पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हे आणि मुळशी या तालुक्यातील पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. युवक महोत्सवात संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य आणि ललितकला अशा पाच प्रमुख गटांतून २७ कला प्रकारात या स्पर्धा होणार आहेत.
 
                                एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत (Savitribai Phule Pune University) विद्यार्थी विकास मंडळ आणि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे नौरोसजी वाडिया महाविद्यालय (Nowrosji Wadia College) यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष २०२५-२६ जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धेचे आयोजन (Organizing a youth festival competition) करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम ऑनलाईन नाव नोंदणी करावी लागणार आहे.
नोकरीची मोठी संधी! धर्मादाय आयुक्त कार्यालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
वाडिया महाविद्यालयात मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरू होणाऱ्या युवक महोत्सवात पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हे आणि मुळशी या तालुक्यातील पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. युवक महोत्सवात संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य आणि ललितकला अशा पाच प्रमुख गटांतून २७ कला प्रकारात या स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धेच्या दिवशी स्पॉट एन्ट्रीची (स्थळ नोंदणी) सुविधा उपलब्ध आहे. या स्पर्धेत पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हा,वे असे आवाहन कुलगुरू, प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू, डॉ. पराग काळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक, डॉ. अभिजीत कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणेचे विश्वस्त, प्राचार्य डॉ. अशोक चांडक यांच्यासह सर्व आयोजक मान्यवरांकडून करण्यात आले आहे.
 
                         eduvarta@gmail.com
                                    eduvarta@gmail.com                                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                     
            
             
            
            