युको बँकेत ५३२ पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात
या भरती मोहिमेअंतर्ग ५३२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी उच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवार युको बँकेचे अधिकृत संकेतस्थळ www.uco.bank.in वर जाऊन अर्ज भरता येणार आहे. ज्या उमेदवारांना बँकेत काम करायचे आहे. त्यांच्यासाठी करिअरची सुरुवात म्हणून ही उत्तम संधी आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे युको बँकेत ही नोकरी फ्रेशर्ससाठी (UCO Bank Recruitment) आहे. अप्रेंटिसशिप पदासाठी ही भरती (Recruitment for the post of Apprenticeship) प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. युको बँकेच्या देशभरातील विविध शाखांमध्ये ही भरती जाहीर (Recruitment process announced) केली आहे. एकूण ५०० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत (Application deadline is October 30th) देण्यात आली आहे.
आश्रमशाळेतील शिक्षकांना टीईटी बंधनकारक; परिपत्रकामुळे नवा वाद
या भरती मोहिमेअंतर्ग ५३२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी उच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवार युको बँकेचे अधिकृत संकेतस्थळ www.uco.bank.in वर जाऊन अर्ज भरता येणार आहे. ज्या उमेदवारांना बँकेत काम करायचे आहे. त्यांच्यासाठी करिअरची सुरुवात म्हणून ही उत्तम संधी आहे.
युको बँकेतील या भरतीमध्ये ५३२ पदे भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. युको बँकेतील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. त्यांच्याकडे मार्कशीट असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि लोकल लँग्वेज टेस्टद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
eduvarta@gmail.com