RRB : तंत्रज्ञ भरती प्रक्रियेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा करा अर्ज
RRB तंत्रज्ञ अर्जासाठी ऑनलाइन नोंदणीकरिता उमेदवारांना अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राची आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत, वैध ओळखपत्र पुरावा (आधार, पॅन, पासपोर्ट इ.), शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, लागू असल्यास जात किंवा श्रेणी प्रमाणपत्र आणि अधिसूचनेत नमूद केले असल्यास अधिवास प्रमाणपत्र हे कागदपत्रे आवश्यक असतील.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
रेल्वे भरती मंडळाने (Railway Recruitment Board) २८ जून २०२५ पासून तंत्रज्ञ भरती मोहिमेसाठी (technician recruitment program) अर्ज (Application) भरण्यास सुरुवात केली आहे. RRB तंत्रज्ञ २०२५ पदांसाठी ऑनलाइन नोंदणी (online registration) करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ पर्यंत असणार आहे. तर सादर केलेल्या अर्जांसाठी अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ३० जुलै आहे. उमेदवारांना १ ते १० ऑगस्ट दरम्यान अर्जांमध्ये सुधारणा करण्याची संधी देखील मिळणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत तब्बल ६ हजार २३८ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक अर्जदार तंत्रज्ञ ग्रेड-१ सिग्नल आणि तंत्रज्ञ ग्रेड-३ पदांच्या विविध श्रेणींमध्ये भरती होण्यासाठी https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing या वेबसाईटवर नोंदणी करू शकतात.
RRB तंत्रज्ञ अर्जासाठी ऑनलाइन नोंदणीकरिता उमेदवारांना अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राची आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत, वैध ओळखपत्र पुरावा (आधार, पॅन, पासपोर्ट इ.), शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, लागू असल्यास जात किंवा श्रेणी प्रमाणपत्र आणि अधिसूचनेत नमूद केले असल्यास अधिवास प्रमाणपत्र हे कागदपत्रे आवश्यक असतील.
उमेदवारांनी अधिकृत भरती पोर्टलला भेट द्यावी. तसेच अर्ज डिजिटल पद्धतीने भरावा. ऑफलाइन सबमिशनची कोणतीही तरतूद नाही, म्हणून उमेदवारांना पोस्टद्वारे कोणतेही कागदपत्रे पाठवू नयेत असा सल्ला आरआरबीमार्फत देण्यात आला आहे. तसेच ज्या उमेदवारांनी २०२४ मध्ये RRB द्वारे प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही CEN साठी आधीच खाते तयार केले आहे त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी समान वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे,” असे अधिकृत वेबसाइटवरील निवेदनात म्हटले आहे.
RRB तंत्रज्ञ २०२५ साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर होमपेजवरील “CEN क्रमांक ०२/२०२५ – तंत्रज्ञ भरती २०२५” विभागात जा. उपलब्ध असलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा, लॉगिन क्रेडेन्शियल्स जनरेट करण्यासाठी तुमचे मूलभूत तपशील (नाव, ईमेल, मोबाइल नंबर) देऊन नोंदणी करा. लॉग इन करा आणि तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक तपशीलांसह अर्ज भरा (फी परतफेडसाठी). अधिसूचनेनुसार तुमचे छायाचित्र, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा. फॉर्म सबमिट करा आणि पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा
दरम्यान, सामान्य/OBC/EWS या प्रवर्गासाठी ५०० रुपये तर SC/ST/PH/महिला यांच्यासाठी २५० रुपये शुल्क असणार आहे. याशिवाय, RRB तंत्रज्ञ पात्रतेनुसार, १ जुलै २०२५ रोजी, तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नलसाठी, उमेदवार १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावेत, तर तंत्रज्ञ ग्रेड III साठी, उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे.