टीईटी परीक्षेसंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका: अनुराधा ओक
कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार सर्वस्वी जबाबदार असतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही ओक यांनी कळविले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council)रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात (Maharashtra Teacher Eligibility Test-TET)युट्यूब चॅनल्ससह विविध समाजमाध्यमावर तसेच प्रसार माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक (Examination Council Commissioner Anuradha Oak)यांनी केले आहे.
उमेदवारांनी परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार सर्वस्वी जबाबदार असतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही ओक यांनी कळविले आहे.
टीईटी परीक्षेसंदर्भातील मागील काही अनुभवांचा विचार करून काळजी घेण्यासाठी म्हणून परीक्षा परिषदेने हे आवाहन केले आहे,असेही अनुराधा ओके यांनी 'एज्युवार्ता' शी संवाद साधताना सांगितले.
eduvarta@gmail.com