मुख्यमंत्र्यांचा ताफा जाण्याऱ्या मार्गावर अपघात; एका शाळकरी मुलांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या परिसरातील व्हीसी हाऊसजवळ ही अपघाताची घटना घडली. मुख्यमंत्री भजन लाल शर्मा हे त्याच मार्गाने शहीद स्मारकाला भेट देणार होते.

मुख्यमंत्र्यांचा ताफा जाण्याऱ्या मार्गावर अपघात; एका शाळकरी मुलांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्वातंत्र्य दिनानिमित्त राजयस्थान मधील जोधपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला जाण्यासाठी वाहतूक वळवण्यात आली. मात्र, याच मार्गाने सकाळी विद्यार्थी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला जात असताना एका ट्रकने शाळकरी मुलांना उडवले. त्यात एका 13 वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

विद्यार्थी हे जोधपूर येथील बरकतुल्ला खान स्टेडियम मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. विमानतळ पोलीस ठाण्याच्या परिसरातील व्हीसी हाऊसजवळ ही अपघाताची घटना घडली. मुख्यमंत्री भजन लाल शर्मा हे त्याच मार्गाने शहीद स्मारकाला भेट देणार होते. मृतांच्या नातेवाईकांनी व लोकप्रतिनिधींनी जोधपूर प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून स्थानिक अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. योग्य सुरक्षा व्यवस्था नसताना मुलांना सकाळीच कार्यक्रमासाठी का बोलावण्यात आले, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

एकावृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मृताची बहीण कोमल म्हणाली,आम्ही घटनास्थळी पोहोचली तेव्हा माझ्या भावाचा मृतदेह तिथे पडला होता. माझे इतर दोन भाऊ, प्रदीप आणि महावीर जखमी झाले होते. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने सांगितले की एका ट्रकने त्यांना धडक दिली. मात्र, अपघात वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकने केला की बस ने केला याबाबत तपास केला जात आहे.

दरम्यान, अपघात स्थळी पोलीस अधिकारी यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला या मार्गाने जाणार होता. त्यामुळे आपघातांमुळे रस्त्यावर पडलेले रक्ताचे डाग पाण्याने स्वच्छ धूऊन साफ करण्यात आले. परंतु, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा,अशी मागणी केली जात आहे.