अमृतसरला खेळायला गेलेल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू : सोमवारी अंत्यसंस्कार

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांची निवड विद्यापीठातर्फे करण्यात आली होती.विद्यापीठाचे वरिष्ठ क्रीडा अधिकारी यांच्यासह क्रीडा स्पर्धेसाठी निवड केलेला संघ अमृतसर येथे गेला होता.

अमृतसरला खेळायला गेलेल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू : सोमवारी अंत्यसंस्कार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून अमृतसर येथे आयोजित क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालत्या रेल्वेतून उतरत असल्याने या विद्यार्थ्याचा अपघात झाला. त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील कॉलेजच्या होता.

 विद्यापीठस्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यातील कॉलेजमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांची निवड विद्यापीठातर्फे करण्यात आली होती.विद्यापीठाचे वरिष्ठ क्रीडा अधिकारी यांच्यासह क्रीडा स्पर्धेसाठी निवड केलेला संघ अमृतसर येथे गेला होता. मात्र. स्पर्धा संपल्यानंतर परतत असताना कोटा येथे रेल्वे थांबणार होती. मात्र, रेल्वे पूर्ण थांबण्यापूर्वी हा विद्यार्थी रेल्वेतून उतरला त्यामुळे त्याचा तोल गेला. या रेल्वे अपघातात त्याच्या पायांना गभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मोठ्याप्रमाणावर रक्तस्राव झाला.

विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.विद्यापीठाचे अधिकारी रविवारी रात्री नाशिककडे रवाना झाले आहेत.