राज्याच्या क्रिडा विभागाने शिवछत्रपती पुरस्कारासाठी २६ जानेवारीपर्यंत मागवले अर्ज
राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी २६ जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाकडून (Maharashtra Government Sports Department) राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (Shiv Chhatrapati State Sports Awards) प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी २६ जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. क्रीडा विभागातर्फे खेळाडूंना विविध पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदाही शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यासाठी खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडूंकडून अर्ज मागविले आहेत.
क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार-विजेत्यांना स्मृतिमानचिन्ह व प्रमाणपत्र पन्नास हजार रुपये मानधन दिले जाते; शासकीय किंवा निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी पात्र ठरल्यास पंचविस हजार मानधन, एसटी प्रवासासाठी विनामूल्य परवाना दिला जातो.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास २६ जानेवारी २०२५ या कालावधीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू, व्यक्ती अर्ज करू शकतात. सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जिल्ह्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या https://sports. maharashtra.gov.in संकेतस्थळावर २६ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.