मराठीच्या स्वाभिमानासाठी लढणारा मराठी माणूस गुंड कसा?
ज्यांनी ज्यांनी मराठी भाषासाठी राजकीय पक्षभेद विसरून मराठी माणसांची वज्रमुठ उभारली त्या सर्वांचे धन्यवाद, राज आणि माझ्यामध्ये जो काही अंतरपाठ होता तो आणाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलो आहोत ते यापुढे एकत्र राहाण्यासाठी.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
ज्यांनी ज्यांनी मराठी भाषासाठी राजकीय पक्षभेद विसरून मराठी माणसांची वज्रमुठ उभारली त्या सर्वांची धन्यवाद, राज आणि माझ्यामध्ये जो काही अंतरपाठ होता तो आणाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलो आहोत ते यापुढे एकत्र राहाण्यासाठी. भेंदू लोकांना सांगत आहे, या भोंदू पणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता. आणि त्यांचे वारसदार म्हणून जनतेच्या समोर उभे आहोत. महाराष्ट्रात जर का मराठीच्या स्वाभिमानासाठी मराठी माणूस लढत असेल नाही त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर होय आम्ही गुंड आहोत. संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण मुंबई मिळवली, इथल्या मराठी माणसांनी मिळवली. तुम्ही फक्त नावाने मराठी आहात, तुमच्यामध्ये मराठी रक्त आहे का नाही हे तपासावे लागेल, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेला केले.
मराठी माणसांनी तत्कालीन सरकारला गुडघ्यावर आणि आणि मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली होती, त्याचा मला अभिमान आहे. मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची करावी लागतेय, का करावी लागली. कोण आहेत आमच्या मराठीचे दुष्मन कोण आहेत. महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्यानंतर देखील काही लोक त्याविरोधात कोर्टात गेले, ही गुंडगिरी नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मराठी माणूस म्हणे मुंबईतून बाहेर गेला, मराठी माणूस आम्ही मुंबईबाहेर नेला असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर २०१४ सालानंतर जे काय तुम्ही जे काय मुंबईला लुबाडले, लचके तोडले, मुंबईतून सर्व उद्योग पळवले, अर्थिक केंद्र गेलं, हिरे व्यापार गेला, मोठंमोठे ऑफिस गुजरातला घेऊन गेलात. आम्ही सरकारमध्ये होतो, तेव्हा राज्यात येणार उद्योग कुठे गेले, मग तेवढेच हिंदू आहेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला. काही लोक म्हणत आहेत यांच्या म मराठीचा नाही महानगरपालिका आहे. अरे आमच्या म महापालिकेचा नाही महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र काबीज करू, असे विरोधकांना उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.