बार्टीतर्फे युवक व युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण
पुण्यातील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांचेकडून एक महिना कालावधीचे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी दि. १८ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२५ आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेमार्फत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवक व युवती आणि महिलांसाठी पुण्यातील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांचेकडून एक महिना कालावधीचे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी दि. १८ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२५ आहे.
अनिवासी स्वरुपाच्या या प्रशिक्षणात उद्योगाची निवड, उद्योग उभारणी व व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन, विविध कर्ज योजना-अनुदान आणि कार्यप्रणाली, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल, उद्योजकांचे अनुभव, उद्योगांना भेटी तसेच उद्योगाचे वित्तीय व्यवस्थापन इत्यादी विषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी किमान इयत्ता आठवी पास असणे गरजेचे आहे.तसेच वयोमर्यादा १८ ते ४५ आहे. पासपोर्ट साईज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आदी कागदपत्रांसह ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. उद्योजकता परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे येथे हजर राहावे, असे आवाहन विभागीय अधिकारी डॉ. अभिराम डबीर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
eduvarta@gmail.com