उल्लास - नवभारत साक्षरता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; असा पाहता येईल निकाल

या चाचणी परीक्षेसाठी चार लाख 59 हजार 553 इतक्या परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. परीक्षार्थींचा निकाल https://results.nios.ac.in/literacy-program/marksheet-district-wise?program_id=Mg== या  लिंक वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

उल्लास - नवभारत साक्षरता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; असा पाहता येईल निकाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्र शासन पुरस्कृत उल्लास  - नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (Ullas  - Navbharat Literacy Programmes)घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी(Basic Literacy and Numeracy Assessment Test) परीक्षेचा निकाल जाहीर(Exam result announced) करण्यात आला आहे.परीक्षार्थी विद्यार्थ्यांना https://results.nios.ac.in/literacy-program/marksheet?program_id=Mg== या लिंक वर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे, असे योजना शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर(Dr. Mahesh Palkar) यांनी कळविले आहे.

केंद्र पुरस्कृत उल्लास  - नवभारत साक्षरता कार्यक्रम केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यात 2022 ते 27 या कालावधीत राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत वय वर्ष 15 ते त्यापुढील असाक्षरतांसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी 18 मार्च 2024 रोजी राज्यातील 36 हजार परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या चाचणी परीक्षेसाठी चार लाख 59 हजार 553 इतक्या परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. परीक्षार्थींचा निकाल https://results.nios.ac.in/literacy-program/marksheet-district-wise?program_id=Mg== या  लिंक वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

------------------

पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) दिनांक १७ मार्च २०२४ चा निकाल पाहण्यासाठी लिंक

१) वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
स्क्रीनवरील पहिल्या चौकटीत 14 अंकी बैठक क्रमांक नमूद करा, त्यानंतर परीक्षेचे वर्ष आणि महिना निवडा. स्क्रीनवर दिसणारा Captcha शेवटच्या चौकटीत टाईप करून submit बटन वर क्लिक करा.
https://results.nios.ac.in/literacy-program/marksheet?program_id=Mg==

२) जिल्ह्याचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
स्क्रीनवरील चौकटीत राज्य, जिल्हा,परीक्षेचे वर्ष,महिना निवडा. त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा Captcha त्याखालील चौकटीत नमूद करून submit बटणावर क्लिक करा.
https://results.nios.ac.in/literacy-program/marksheet-district-wise?program_id=Mg==

            किंवा 
ULLAS ॲपच्या प्रथम पृष्ठावरील certification या मेनूवर क्लिक करून आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.