केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात..
registration.ind.in या साईटवर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 मे पर्यंत देण्यात आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
तुम्ही सरकारी नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. इंडियन नेव्हल डॉकयार्ड मुंबई (Indian Naval Dockyard Mumbai) यांच्याकडून भरती प्रक्रियेची अधिसुचना प्रसिद्ध (Notice published) करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने (Apply online) अर्ज करावा लागणार आहे. registration.ind.in या साईटवर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 मे (Deadline to apply is May 10) पर्यंत देण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी उर्वरित मुदतीत अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी आयटीआय पास उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया इंडियन नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांच्याकडून राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया 301 पदांसाठी पार पडत आहे. registration.ind.in या साईटवर भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
इलेक्ट्रीशियन, वेल्डर, मशीनिस्ट, इंस्ट्रूमेंट मॅकेनिक, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रोप्लेटर, पाइप फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा आयटीआय पास अधिक दहावी पास उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवार हा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास असावा.