UPSC Result : 'यूपीएससी' परीक्षेचा निकाल जाहीर; इशिता किशोर देशात पहिली

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यात देशातून इशिता किशोर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

UPSC Result : 'यूपीएससी' परीक्षेचा निकाल जाहीर; इशिता किशोर देशात पहिली
UPSC result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल (UPSC Result) मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यात देशातून इशिता किशोर (Ishita Kishor) हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे, तर गरिमा लोहिया (Garima Lohia), उमा हरती एन यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे.

पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयएएस, आयपीएस,आयएफएस, आणि केंद्रीय सेवांमधील गट क व गट ख मधील पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. आयोगाने 933 उमेदवारांची या पदांसाठी शिफारस केली आहे.

परीक्षेचा निकाल  http//www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून इशिता किशोर, गरिमा लोहिया, उमा हरती एन, स्मृती मिश्रा, मयूर हजारिका, गहना नव्या जेम्स, वसीम अहमद भट, अनिरुद्ध यादव, कनिका गोयल, राहुल श्रीवास्तव हे विद्यार्थी अनुक्रमे पहिल्या दहा क्रमांकावर आहेत. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2