टीईटी परीक्षेचे अर्ज जानेवारीत भरा ; फेब्रुवारीत घेणार पहिली ऑनलाईन परीक्षा 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जाणा-या परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

टीईटी परीक्षेचे अर्ज जानेवारीत भरा  ; फेब्रुवारीत घेणार पहिली ऑनलाईन परीक्षा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council)घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षे (टीईटी- TET) तयारी अंतिम टप्प्यात असून  येत्या फेब्रुवारी महिन्यात पहिली ऑनलाईन टीईटी परीक्षा (First Online TET Exam)घेतली जाणार आहे.तसेच टीईटी परीक्षेच्या जाहिरातीचे काम पूर्ण झाले असून जानेवारी महिन्यात परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरूवात (Accepting applications for the exam) केली जाणार आहे.त्यामुळे टीईटी परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची (student) प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे (Maharashtra State Examination Council Chairman Dr. Nand Kumar Bedse) यांनी या संदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राज्यात सध्या शिक्षक भरातीचे वारे वाहत आहेत.डिसेंबर महिना अखेरीस राज्य भरातील शिक्षक भारतीची जाहिरात प्रसिध्द होणार आहे.त्यामुळे शिक्षक होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे.त्यातच आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये पहिली ऑनलाईन टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.आत्तापर्यंतच्या सर्व परीक्षा या ऑफलाईन अर्थात ओएमआर शीट वर घेतल्या जात होत्या.परंतु,इतर परीक्षाप्रमाणे टीईटी सुध्दा आता ऑनलाईन घेतली जाणार आहे.त्यामुळे सध्या परीक्षेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत.तसेच ऑनलाईन परीक्षेसाठी राज्यात उपलब्ध असलेलया परीक्षा केंद्रांच्या तारखा मिळवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : राजपथावर संचलनाचे राज्यातील १२ मुलींचे स्वप्न साकार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ३ मुली

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जाणा-या परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.परीक्षेची जाहिरात येत्या जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केली जाईल.उमेदवारांचे अर्ज स्वीकारल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पात्र उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल.सध्या परीक्षा घेणा-या एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

------------------------

राज्यात सर्वत्र विविध पदांच्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत.तसेच मार्च महिन्यात विविध व्यासाईक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच टीईटी परीक्षा घ्यावी लागणार आहे.त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी परीक्षा सेंटर मिळणे अडचणीचे होणार आहे.
--------------------------------------