UPSC NDA आणि CDA-1 2024 परीक्षांचे निकाल जाहीर 

UPSC NDA आणि CDA-1 2024 परीक्षांचे निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


UPSC च्या NDA आणि CDA 1 2024 च्या परीक्षेत बसलेल्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने 21 एप्रिल रोजी घेतलेल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी (NDA आणि NA) 1 परीक्षा 2024 आणि संयुक्त संरक्षण सेवा (CDS) 1 परीक्षा 2024 चे निकाल जाहीर केले आहेत. 

UPSC ने NDA/CDS 1 लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे पुढील टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे रोल नंबर देखील प्रसिध्द केले आहेत. USPSC ने जारी केलेल्या दोन्ही परीक्षांच्या अधिसूचनेनुसार, NDA/CDS 1 निकालांमध्ये यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना सेवा निवड मंडळाच्या (SSB) मुलाखतींमध्ये समाविष्ट केले जाईल. या मुलाखतीसाठी उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल. दोन्ही परीक्षांसाठी उमेदवार भारतीय सैन्य भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर जाऊन नोंदणी करू शकतात.


असा तपासा तुमचा रोल नंबर 

* UPSC NDA 1 आणि CDS 1 लेखी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना त्यांचा रोल नंबर तपासण्यासाठी आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी लागेल. 
* त्यानंतर उमेदवारांना मुख्यपृष्ठावरच दिलेल्या NDA/CDS निकालाच्या संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
* यानंतर, दोन्ही परीक्षांच्या निकालांची अधिसूचना आणि यशस्वी उमेदवारांच्या रोल नंबरची यादी PDF स्वरूपात असेल.