तब्बल 3 हजार 712 पदांसाठी SSC CHSL अंतर्गत बंपर भरती ; ऑनलाईन अर्जाची 'ही' अंतिम मुदत

उमेदवार ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

तब्बल 3 हजार 712 पदांसाठी SSC CHSL अंतर्गत बंपर भरती ; ऑनलाईन अर्जाची 'ही' अंतिम मुदत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.  स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) विविध पदांच्या भरतीसाठी (CHSL) 2024 अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर (Official website) ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

भरती आणि अर्जाच्या पद्धतीशी संबंधित महत्त्वाचे तपशील संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. SSC च्या अधिसूचनेनुसार, SSC CHSL 2024 द्वारे, केंद्र सरकारच्या विविध विभाग/मंत्रालयांमध्ये निम्न विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर सारख्या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. बारावी पास उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. 

स्टाफ सिलेक्शन कमिशनने याबाबत माहिती दिली असून. नवीन अपडेट नुसार ही भरती जवळपास 3 हजार 712 पदांसाठी होत आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर अशा पदांचा समावेश आहे. या सर्व पदांवर केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये थेट भरती केली जाणार आहे. या प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख येत्या 7 मेपर्यंत आहे.