शालेय पोषण आहारात पुन्हा बदल होणार ; देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

ज्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आहे, असे शाकाहारी पदार्थ वियदार्थांना पर्याय म्हणून देण्यात येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शालेय पोषण आहारात पुन्हा बदल होणार ; देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात (School nutrition) प्रोटीनसाठी अंडी खायला देवू नका, अशी मागणी समाजातून केली जात  (Parents Complaint) आहे. त्यामुळे आम्ही ही बाब गंभीरपणे घेतली असून यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांच्याशी बोललो आहे.  मुलांना प्रोटीन देणे आवश्यक आहे (Children need protein) पण जे विद्यार्थी शाकाहारी आहेत ; त्यांच्यासाठी ज्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आहे,असे शाकाहारी पदार्थ दिले जातील, असे राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले. 

 आम्ही प्रोटीनला कसे बदलता येईल ते पाहात आहोत. निश्चित प्रकारे आम्ही या गोष्टीला गंभीरपणे घेतले आहे. मु्ख्यमंत्री यांनी देखील गंभीरतेने हा विषय घेतला आहे. त्यामुळे यामध्ये जे आवश्यक बदल आहे ते आम्ही निश्चित करणार आहेत, असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सांगितले. 

राज्यातील शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात उकडलेली अंडी व  केळी देण्यात येतात. हा निर्णय लागू करण्यात आला तेव्हा देखील काही ब्राम्हण संघटनांनी आणि वारकरी संप्रादायातील पालकांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे शासन आता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.  

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.youtube.com/shorts/8QjjHNLY4kI