मोठी बातमी: UGC NET परीक्षा रद्द;पेपर लीक झाल्याचा संशय

 विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेकडून १९ जून रोजी काही इनपूट प्राप्त झाले होते. त्यानुसार मंगळवारच्या परीक्षेत काहीतरी गडबड झाल्याचा संशय बळावत होता.

मोठी बातमी: UGC NET परीक्षा रद्द;पेपर लीक झाल्याचा संशय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे घेण्यात आलेल्या UGC-NET परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या संशयामुळे UGC NET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे १८ जून रोजी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.'परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education) UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे," असे शिक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदाबरोबरच यंदा प्रथमच नेट परीक्षेतील गुणांच्या आधारे पीएचडीला प्रवेश दिला जाणार होता. त्यामुळे या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणारी नेट परीक्षा यावर्षी पेन व पेपर पद्धतीने ऑफलाइन आयोजित करण्यात आली होती.

 विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेकडून १९ जून रोजी काही इनपूट प्राप्त झाले होते. त्यानुसार मंगळवारच्या परीक्षेत काहीतरी गडबड झाल्याचा संशय बळावत होता.त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १८ जून २०२४ रोजी देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलेली युजीसी नेट परीक्षा २०२४ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.आता UGC NET परीक्षचे  हॉल तिकिट आणि सिटी स्लीप पुन्हा नव्याने होणार जाहीर आहे.