NEET PG प्रवेशपत्र प्रसिद्ध ; सोबतच मार्गदर्शक सूचना जारी 

उमेदवार NBEMS च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जाऊन ते डाउनलोड करू शकतात.

NEET PG प्रवेशपत्र प्रसिद्ध ; सोबतच मार्गदर्शक सूचना  जारी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नीट PG (NEET PG) 2024 पात्रता प्रवेश परीक्षा 23 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.  नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे या परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध (Admit card released) करून देण्यात आले आहेत. उमेदवार NBEMS च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. यासोबतच परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 

राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून NEET परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांनी परीक्षा केंद्राची ओळख करून घ्यावी आणि वेळेत परीक्षेसाठी हजर राहावे. उमेदवाराला कोणत्याही प्रकारे उशीर झाल्यास, परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी NBEMS कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही, असे सांगण्यात आले आहे. 

NBEMS द्वारे प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार, उमेदवारांनी हॉल तिकीटाची प्रत, शासनाने प्रसिद्ध केलेला फोटो असलेल्या ओळख पुरावा मूळ हार्ड कॉपी आणि MBBS पात्रतेच्या कायम/तात्पुरत्या SMC/MCI/NMC नोंदणीची छायाप्रत सोबत ठेवावी. ही कागदपत्रे सोबत न ठेवल्यास तुम्हाला परीक्षेसाठी केंद्रात प्रवेश मिळणार नाही.

हॉल तिकिट कसे डाउनलोड करावे

NEET PG हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला ॲडमिट कार्डच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला नोंदणी आयडी आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करावे. यानंतर, स्क्रीनवर तुमचे हॉल तिकिट उघडेल जिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंटआउट घेऊ शकता.