UGC India : आता ‘युजीसी’चे प्रत्येक महत्वाचे अपडेट मिळणार थेट तुमच्या मोबाईलवर

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात, विविध क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटी एकसमान नाही. अशा स्थितीत यूजीसीच्या संकेतस्थळावर सर्वसामान्यांना उपलब्ध होईल, असे ठामपणे सांगता येणार नाही.

UGC India : आता ‘युजीसी’चे प्रत्येक महत्वाचे अपडेट मिळणार थेट तुमच्या मोबाईलवर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील विद्यापीठे, विद्यार्थी आणि शिक्षक तसेच इतर सर्व संबंधित घटकांना अपडेट्स राहण्यासाठी ‘UGC India’ हे व्हॉट्सॲप चॅनेल (WhatsApp Channel) सुरू केले आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार (M. Jagdish Kumar) यांनी याविषयी माहिती दिली आहे.

 

जगदीश कुमार म्हणाले की, "UGC चा हा नवीन उपक्रम उच्च शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि शिक्षक तसेच इतर वापरकर्ते खरी आणि अद्ययावत माहिती सहज मिळवू शकतील याची खात्री करण्यासाठी आहे. UGC आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करत व्हॉट्सॲप सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून  आपल्या वापरकर्त्यांना उच्च शिक्षणाशी संबंधित माहिती रिअल टाईममध्ये मिळविण्यासाठी सर्व शक्य मदत करेल."

शिक्षक भरती प्रक्रियेला वेग; लवकरच जाहिराती निघणार, आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

 

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात, विविध क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटी एकसमान नाही. अशा स्थितीत यूजीसीच्या संकेतस्थळावर सर्वसामान्यांना उपलब्ध होईल, असे ठामपणे सांगता येणार नाही. असे असूनही, सध्या व्हॉट्सअॅप चॅनल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ बनले आहे.

 

व्हॉट्सअॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा साधेपणा. अशा वेळी यूजीसीचा हा उपक्रम डिजिटल डिव्हाईड दूर करून उच्च शिक्षणाशी संबंधित प्रत्येक अपडेट सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच मदत करेल, असेही जगदीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

 

 यूजीसी इंडिया वॉट्सऍप  चॅनेलमध्ये कसे सामील व्हावे?

* तुमच्या मोबाईलमध्ये WhatsApp उघडा.

* नंतर अपडेट्स विभागात जा.

* आता चॅनल विभाग उपलब्ध होईल.

* चॅनल विभागात फाइंड चॅनेलवर UGC India टाइप करा.

* आता फॉलो बटणावर क्लिक करा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k