शिकतानाच प्रशिक्षण घ्या अन् मिळवा नोकरी! कौशल्य विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यापीठामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमही घेतले जाणार आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.

शिकतानाच प्रशिक्षण घ्या अन् मिळवा नोकरी! कौशल्य विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू
Maharashtra State Skill University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (NEP 2020) विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणाचा आग्रह धरण्यात आला आहे. केवळ घोकंपट्टी न करता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे, शिक्षण घेत असतानाच त्यांना विविध कौशल्य आत्मसात करता यावीत, हा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (Maharashtra State Skill University) असेच कौशल्याधारित २१ अभ्यासक्रम तयार केले असून विद्यार्थ्यांना शिकता-शिकता नोकरीची संधीही मिळणार आहे. (MSSU admissions to undergraduate and postgraduate courses)

 

विद्यापीठामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमही घेतले जाणार आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रवेश परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येईल.

हेही वाचा : केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट; विद्यार्थ्यांकडून संताप 

विदयापीठातील सर्व अभ्यासक्रम कौशल्याधारित असल्याने केवळ ४० अभ्यासक्रम हे वर्गात बसून शिकविले जाणार आहेत. तर ६० टक्के अभ्यासक्रम हा प्रशिक्षणावर आधारित असेल. त्यामुळे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रातील कंपनीमध्ये काम करण्याची संधीही मिळणार आहे. पदवी मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी शिकत असताना केलेल्या कामाबाबतचे अनुभव प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्याअनुषंगाने १५ करार करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

नोकरीची चिंता सोडा

''कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांतून रोजगार निर्मिती होणार आहे. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच प्रशिक्षण मिळणार असल्याने नोकरी मिळण्याची चिंता राहणार नाही. त्यादृष्टीने कंपन्यांशी करार केले जाणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना मल्टीपल एक्झिट आणि मल्टीपल एंट्री उपलब्ध असेल. त्यानुसार त्यांना प्रमाणपत्र दिली जातील.''

 - डॉ. अपूर्वा पालकर, कुलगुरू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ

असे आहेत अभ्यासक्रम –

  • बी.टेक. (कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अन्ड मॅनेजमेंट, मेकॅट्रोनिक्स इंजिनिअरींग, आयटी, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग)
  • एम.टेक. (कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अन्ड मॅनेजमेंट, मेकॅट्रोनिक्स इंजिनिअरींग, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स अन्ड आर्टिफिशल इंटिलिजन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग)
  • बी.बी.ए. (रिटेल, बीएफएसआय, हॉस्पिटॅलिटी)
  • एम.बी.ए. (डिजिटल मार्केटिंग, बिझनेस अनालिटिक्स, इनोव्हेशन अन्ड न्यू व्हेंचर मॅनेजमेंट)
  • इतर पदवी अभ्यासक्रम (अर्थशास्त्र, मानसशास्त्र, वेलनेस मॅनेजमेंट, हेल्थकेअर मॅनेजमेंट)
  • इतर पदव्युत्तर पदवी (मानसशास्त्र व समुपदेशन, वेलनेस मॅनेजमेंट, हेल्थकेअर मॅनेजमेंट)

 

पदवी व पदव्युत्तर पदवीचे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

पदवी अभ्यासक्रम (अभियांत्रिकी)

ऑनलाईन अर्ज भरणे – २ जून ते ५ जुलै

प्रवेश परीक्षा - १० जुलै

निकाल – १७ जुलै

प्रवेशाची शेवटची मुदत – ७ ऑगस्ट

वर्ग सुरू – १६ ऑगस्ट

 

पदवी अभ्यासक्रम (इतर)

ऑनलाईन अर्ज भरणे – १३ ते ३१ मे आणि १५ जून ते १५ जुलै

प्रवेश परीक्षा – ४ जून आणि २१ जुलै

निकाल – ७ जून आणि २६ जुलै

प्रवेशाची शेवटची मुदत – १२ जून आणि १ ऑगस्ट

वर्ग सुरू – ७ ऑगस्ट

 

पदव्युत्तर पदवी (अभियांत्रिकी)

ऑनलाईन अर्ज भरणे – ३१ मेपर्यंत आणि १ ते ३१ जुलै

प्रवेश परीक्षा - १० जून आणि १२ ऑगस्ट

निकाल – १७ जून आणि १८ ऑगस्ट

प्रवेशाची शेवटची मुदत – २६ जून आणि २८ ऑगस्ट

वर्ग सुरू – ४ सप्टेंबर

 

पदव्युत्तर पदवी (इतर)

ऑनलाईन अर्ज भरणे – ३० मेपर्यंत आणि १५ जून ते १५ जुलै

प्रवेश परीक्षा – ४ जून आणि २१ जुलै

निकाल – ७ जून आणि २६ जुलै

प्रवेशाची शेवटची मुदत – १२ जून आणि १ ऑगस्ट

वर्ग सुरू – ७ ऑगस्ट

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2