शिफारस पत्रांना वाहिली श्रध्दांजली! ९४ मराठा उमेदवार १४ महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेची जाहिरात ३ एप्रिल २०१९ रोजी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर २३ जून रोजी पूर्व परीक्षा तर २४ नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा झाली.

शिफारस पत्रांना वाहिली श्रध्दांजली! ९४ मराठा उमेदवार १४ महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेतून (Maharashtra Engineering Service Exam) नियुक्तीसाठी पात्र ठरलेले ९४ उमेदवार मागील चौदा महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे. मराठा (Maratha) समाजातील या हताश झालेल्या उमेदवारांनी गुरूवारी पुण्यातील जिल्हाधिकारी (Pune District Collector) कार्यालयासमोर शिफारस पत्रांना श्रध्दांजली वाहून राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध केला.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेची जाहिरात ३ एप्रिल २०१९ रोजी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर २३ जून रोजी पूर्व परीक्षा तर २४ नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा झाली. पात्र उमेदवारांच्या मुलाखती ४ ऑक्टोबर २०१२१ ते २ फेब्रुवारी २०२२ यादरम्यान झाल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल १० जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर पात्र उमेदवारांना १३ जून २०२२ रोजी  १ हजार ४९ शिफारस पत्र देण्यात आली. त्यानुसार २ डिसेंबर २०२२ रोजी ९४ उमेदवार वगळून इतरांना नियुक्ती दिल्याचा दावा या उमेदवारांनी केला आहे.

शरद पवारांच्या संस्थेतील महाविद्यालयाचे अजित पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेकडे हस्तांतरण

डिसेंबर २०२२ मध्ये ९४ SEBC To EWS (मराठा) उमेदवार सोडून इतर सर्व उमेदवार रुजू झाले. EWS याबाबतचा जीआर रद्द झाल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. आठ महिने होऊनही आम्ही नियुक्तीपासून वंचित असल्याचे उमेदवार राहूल बागल यांनी सांगितले. आम्ही ९४ मराठा उमेदवार जलसंपदा, जलसंधारण तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये शिफारस पात्र  उमेदवार आहोत. आम्ही गुणवत्ता यादीतही वरच्या क्रमांकावर आहोत. आता जरी गुणवत्ता यादी नव्याने लावली तर रुजू झालेले अनेकजण बाहेर पडतील, असेही बागल यांनी सांगितले.

SPPU News : प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कॅरीऑन पद्धत सुरू करण्याची मागणी

आठ महिन्यात नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना व त्यांच्या कुटुंबीयांना खूप मानसिक तणावजन्य व नैराश्याच्या परिस्थितीतून जावे लागत आहे, असल्याचे उमेदवारांनी सांगितले. या उमेदवारांनी राज्य सरकार मधील विविध मंत्री, आमदार, खासदार यांना भेटून निवेदने दिली. आझादा मैदानावरही आंदोलन केले. परंतु कुणीही दाद दिली नाही. त्यामुळे आता उमेदवारांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे बागल यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यभरातून एकत्रित आलेल्या उमेदवारांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी प्रातिनिधिक शिफारस पत्राला हार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. तसेच हातात सरकारचा निषेध तसेच मागण्यांचे फलक घेऊन घोषणाबाजी केली. यापुढे आता आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo