NEET UG वाद : सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

कोटा येथील मोशन एज्युकेशन संस्थेच्या वतीने NEET परीक्षेतील गैरप्रकारांबाबत डिजिटल सत्याग्रह सुरु करण्यात आला आहे.

NEET UG वाद : सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय बनलेल्या NEET UG परीक्षे संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढत आहे. आता पर्यंत सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)याचिका दाखल केली आहे. त्यात NEET पुन्हा घेण्यात यावी किंवा ग्रेडिंग मार्क (grading mark) रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. कोटा येथील शिक्षणतज्ज्ञ नितीन विजय (Educationist Nitin Vijay from Kota)यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहेत.

कोटा येथील मोशन एज्युकेशन संस्थेच्या वतीने NEET परीक्षेतील गैरप्रकारांबाबत डिजिटल सत्याग्रह सुरु करण्यात आला आहे. या सत्याग्रहाचा एक भाग म्हणून या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. देशात क्रमांकावर 67 विद्यार्थी होते. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक कसा मिळाला? विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७१८, ७१९ गुण कसे दिले गेले? कारण विद्यार्थ्यानी सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली असती तर त्यांना ७२० गुण मिळाले असते आणि एक प्रश्नही चुकला असता तर वजा मार्किंगमुळे त्याला जास्तीत जास्त ७१५ गुण मिळाले असते. NTA ने निकाल जाहीर करण्याची संभाव्य तारीख 14 जून दिली होती, परंतु,निकाल 10 दिवस आधी 4 जूनच्या संध्याकाळी जाहीर करण्यात आला. याचे कारण काय?, असे अनेक प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.

NTA  ग्रेस गुणांबाबत न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत आहे. 2018 मध्ये CLAT साठी या सूचना देण्यात आल्या होत्या. ती ऑनलाइन परीक्षा होती, तर NEET ही ऑफलाइन परीक्षा आहे. त्या सूचनेचा दाखला देत ग्रेस मार्क्स देणे कितपत योग्य आहे? ग्रेस मार्क्स देण्याचा नियमही समजला नाही. पेपर उशिरा वाटला असता तर जास्त वेळ दिला असता, मार्क्स का दिले? बुलेटिनमध्ये ग्रेस मार्कचा उल्लेख नाही. तक्रार करणाऱ्यांनाच ग्रेस गुण मिळाले आहेत. ज्या मुलांनी तक्रार केली नाही त्यांचा काय दोष?

केंद्रात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे प्रत्येक विद्यार्थ्याचा किती वेळ वाया गेला हे एनटीएने ठरवले आहे, परंतु,संपूर्ण टीमने हे फुटेज पाहिल्यास दोन वर्षे लागतील. त्यामुळे वेळ कमी पडल्यास ग्रेस नंबर देण्यासाठी NTA कडे कोणताही आधार किंवा तर्क नाही, असा मुद्दा नितीन विजय यांनी उपस्थित केला आहे.