महाविद्यालयांमध्ये समुपदेशकाचे पद निर्माण करणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

अमली पदार्थांच्या व्यसनापासून युवकांनी दूर राहावे यासाठी प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशकाचे एक अतिरिक्त पद (किमान व्हिजिटिंग) निर्माण करण्याचा शासन गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली

महाविद्यालयांमध्ये समुपदेशकाचे पद निर्माण करणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अमली पदार्थांच्या व्यसनापासून युवकांनी दूर राहावे यासाठी प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशकाचे (Counselor post) एक अतिरिक्त पद (किमान व्हिजिटिंग) निर्माण करण्याचा शासन गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील (Higher Education and Technology Minister Chandrakant Patil) यांनी दिली. जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त (World Anti-Drug Day) सोमेश्वर फाउंडेशनने कार्टून्स कंबाईनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात पाटील बोलत होते.

सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक सनी निम्हण यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . शहरातील प्रथितयश व्यंगचित्रकारांनी 'पुणेकरांनो एकत्र येऊन अमली पर्दार्थांच्या विरोधात लढू या' असा संदेश देणारी व्यंगचित्रे यावेळी काढण्यात आली होती. चारूहास पंडित, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, धनराज गरड, शरयू फरकांडे, लहू काळे, अश्विनी राणे या व्यंगचित्रकारांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

अमली पदार्थांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि ते चिंताजनक आहे. 70 लाख लोकसंख्येचे शहर हे जवळजवळ कामातून गेले अशी प्रतिमा निर्माण होत आहे. त्यामुळे पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. येथे उद्योगांची संख्या मोठी असून, आरोग्य सेवा उत्तम आहेत. वेगाने विकसित होणारे देशातील आठव्या क्रमांकाचे शहर ही प्रतिमा जगातील व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेले  शहर अशी चुकीची होत आहे. त्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात अडकले असल्याचे चित्र निर्माण होत आहे. तरूण पिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दीर्घकालीन, व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. आगामी काळात जनजागृती, समुपदेशन, पुनर्वसन, औषधोपचार आणि अमली पदार्थांना हद्दपार करणे, असा हा पाच कलमी कार्यक्रम असणार आहे.