अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीतून ३८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश ; ॲडमिशन घेणे बंधनकारक 

प्रथम पसंतीक्रम नुसार अलॉट झालेल्या विद्यालयात विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित न केल्यास पुढील दोन नियमित प्रवेश फेरीसाठी संबंधित विद्यार्थी पात्र असणार नाही.

अकरावीच्या पहिल्या  गुणवत्ता यादीतून ३८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश ; ॲडमिशन घेणे बंधनकारक 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pune and Pimpri Chinchwad Municipal Corporation)कार्यक्षेत्रांतर्गत इयत्ता अकरावी (11th Standard)केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची (Centralised Online Admission Process)पहिली अंतिम गुणवत्ता यादी (First Final Quality List )27 जून रोजी सकाळी जाहीर केली जाणार आहे.त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या 1 जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार आहेत,असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे (Deputy Director Of Education)स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात एकूण प्रवेश क्षमता १ लाख २० हजार २६५ असून अंतिम गुणवत्ता यादीमध्ये ६६ हजार ९३४ विद्यार्थी आहेत.त्यापैकी ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहेत. प्रथम पसंतीक्रम दिलेल्या २९ हजार ८४० विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट झाले आहे. प्रथम पसंती क्रम दिलेले महाविद्यालय अलॉट झाल्यास त्या महाविद्यालयात संबंधित विद्यार्थ्यांने प्रवेश निश्च्छित करावयाचा आहे. प्रथम पसंतीक्रम नुसार अलॉट झालेल्या विद्यालयात विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित न केल्यास पुढील दोन नियमित प्रवेश फेरीसाठी संबंधित विद्यार्थी पात्र असणार नाही,याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

कला शाखेत 3  हजार 640 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहेत.तर वाणिज्य शाखेच्या १४ हजार २११ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे.तसेच विज्ञान शाखा २० हजार ६०४ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे.त्याचप्रमाणे व्यावसायिक शिक्षण शाखेकरिता ४३५ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले आहे. असे विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यालयात गेल्यास त्यांना कागदपत्राअभावी प्रवेश नाकारू नये. हमी पत्र घेऊन त्यांना प्रवेश देण्यात यावा,अशा स्पष्ट सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन व पार्ट वन भरायचे बाकी आहे. त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन व पार्ट वन भरावयाची सूचना पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सदस्य सचिव व पुणे उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक डॉ. ज्योती परिहार कार्यालय यांनी सांगितली.