बारावीनंतर मेजर, मायनर सब्जेक्ट कसे निवडायचे ?

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे.त्यासाठी  विद्यार्थ्यांना मुख्य विषय (मेजर सब्जेक्ट) आणि उपप्रमुखविषय (मायनर सब्जेक्ट)निवडावे लागणार आहेत.

बारावीनंतर मेजर, मायनर सब्जेक्ट कसे निवडायचे ?
NEP Major and Minor Subjects

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार national education policy यंदा प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना मुख्य विषय (मेजर सब्जेक्ट) आणि उपप्रमुखविषय (मायनर सब्जेक्ट) (major subject and minor subject) निवडावे लागणार आहेत.त्याबाबत विद्यार्थी व पालकांचा student and parent गोंधळ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे आहे,हे तपासणे महत्वाचे ठरणार आहे. 
   इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.२०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे.त्यामुळे प्रथम वर्षांपासून विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा किंवा चार वर्षांचा डिग्री प्रोग्रॅम निवडता येणार आहे. परंतु, त्यासाठी  विद्यार्थ्यांना मुख्य विषय (मेजर सब्जेक्ट) आणि उपप्रमुखविषय (मायनर सब्जेक्ट)निवडावे लागणार आहेत.महाविद्यालयात प्रवेशासाठी गेल्यानंतर विद्यार्थ्याला कोणते विषय निवडायचे असे विचारले जाणार आहे.परिणामी विषय निवडीच्या वेळी विविध अडचणी येवू शकतात.त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी नेमक्या कोणत्या आहेत, कल कोणते आहेत?  हे पाहणे सुद्धा आवश्यक आहे. 
     प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने  ‘मॉडर्न मीडिया स्टेशन’ या युट्युब चॅनलवर आभासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा गुरूवार, (दि. २५) संध्याकाळी ४.३० वाजता आभासी पद्धतीने होणार आहे.यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र झुंजारराव बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन मॉडर्न महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.