विद्यापीठाच्या परीक्षांसाठी आता पुरवणी मिळणार नाही 

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी केवळ 24 पानी आणि 36 पानी उत्तरपत्रिका दिली जाणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षांसाठी आता पुरवणी मिळणार नाही 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University)घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेबरोबर (answer sheet) काही वेळा पुरवण्या (Supplement)जोडाव्या लागत होत्या.परंतु, या पुरवण्यांचे मास्किंग करणे, पुरवण्या गहाळ (Supplement missing) होऊ नये म्हणून काळजी घेणे, याकडेही लक्ष द्यावे लागत होते. मात्र, येत्या परीक्षेपासून विद्यापीठ पुरवणीशिवाय परीक्षा घेणार (The university will conduct the examination without supplement)आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी केवळ 24 पानी आणि 36 पानी उत्तरपत्रिका (24 pages and 36 pages answer sheet)दिली जाणार आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या खर्चात काही प्रमाणात घटही होणार आहे. 

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदानागर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये सुमारे साडेसात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यांना पूर्वी परीक्षेसाठी उत्तरपत्रिका व पुरवणी  दिली जात होती.विद्यापीठाला उत्तरपत्रिका व पुरवणी यासाठी स्वतंत्र खर्च येत होता. तसेच उत्तरपत्रिकांचे व पुरवण्याचे वितरण करावे लागत होते. विद्यार्थ्यांना कमी पानाच्या उत्तरपत्रिकांबरोबर काहीवेळा एकापेक्षा जास्त पुरवण्या जोडाव्या लागत होत्या. परीक्षेदरम्यान या पुरवण्यांचे स्वतंत्रपणे मास्किंग करावे लागत होते. त्यात बराच वेळा जात होता. तसेच विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेला जोडलेल्या पुरवण्या गहाळ होत असल्याच्या तक्रारीही येत होत्या.त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने परीक्षेसाठी यापुढील काळात 50 गुणांपर्यंतच्या परीक्षेसाठी 24 पानी उत्तरपत्रिका आणि त्यापुढील 70 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 36 पानी उत्तरपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थी या उत्तरपत्रिकांमध्ये पूर्ण प्रश्न पत्रिका सोडवू शकतील. मात्र, एखादा विद्यार्थी 24 किंवा 36 पानात दिलेली प्रश्नपत्रिका सोडवू शकला नाही तर त्याला आणखी एक उत्तरपत्रिका दिली जाऊ शकते.मात्र,त्याची आवश्यकता भासणार नाही,असे अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे म्हणाले,परीक्षा विभागाकडून परीक्षेच्या कामकाजात आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत.कागदपत्रांसाठी ऑनलाईन सुविधा हा त्याचाच एक भाग आहे. तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेबरोबर पूर्वी पुरवणी सुध्दा दिली जात होती.मात्र,येत्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना 24 व 36 पानांच्या उत्तरपत्रिका दिल्या जातील.त्यामुळे विद्यार्थ्यांची व शिक्षकांची गैरसोय होणार नाही.तसेच पुरवणी देण्याची आवश्यकता भासणार नाही.

-------------------
उत्तरपत्रिकेबरोबर पुरवणी घेण्याचा आणि ती पुरवणी बांधण्याचा विद्यार्थ्यांचा वेळा वाचणार आहे.तसेच मास्किंगसाठी जाणारा वेळ वाचेल.परिणामी उत्तरपत्रिका जमा करण्याचे व तपासण्याचे काम जलद गतीने होईल.त्यामुळे विद्यार्थ्यांना 24 व 36 पानी उत्तरपत्रिका देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. 
-डॉ.डी.बी.पवार, सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
------------------------------