IIT Admission : ‘आयआयटी’च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा

JAM 2024 साठी नोंदणी अधिकृत पोर्टलवर ५ सप्टेंबरपासून सुरू होईल. दि. १३ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करता येऊ शकेल.

IIT Admission : ‘आयआयटी’च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा
JAM 2024

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मुंबईच्या GATE-JAM कार्यालयाने जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स (JAM) २०२४ चे jam.iitm.ac.in या संकेतस्थळाची अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी परीक्षा आयोजित करणारी संस्था आयआयटी मद्रास आहे. ही परीक्षा ११ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतली जाईल.

JAM 2024 साठी नोंदणी अधिकृत पोर्टलवर ५ सप्टेंबरपासून सुरू होईल. दि. १३ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करता येऊ शकेल. पेपर एकसाठी, SC, ST, PWD प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क  म्हणून ९०० रुपये भरावे लागतील, तर इतर सर्व उमेदवारांना १ हजार ८०० रुपये भरावे लागतील. 

ज्या उमेदवारांनी पदवी पूर्ण केली आहे किंवा सध्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकत आहेत असे विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय भारतीय पदवी असलेले परदेशी नागरिकही या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

SPPU NEWS: पीएच.डी. प्रवेशाच्या नियमावलीत बदल ; विद्यापीठाचे प्रवेश नोव्हेंबरमध्ये

 JAM २०२४ चा निकाल २४ मार्च २०२४ रोजी जाहीर होईल. जेएएम स्कोअरद्वारे, विद्यार्थ्यांना एमएससी, एमएससी (टेक), एमएससी-एमटेक ड्युअल डिग्री, एमएस (संशोधन), संयुक्त एमएससी - पीएचडी आणि एमएससी - पीएचडी ड्युअल डिग्री प्रोग्राममध्ये प्रवेश मिळेल.

परीक्षेतील गुणांच्या आधारावर IIT , इंडिअन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स (IISc), नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) शिबपूर, संत लोंगोवाल इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (SLIET) सारख्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. 

ही परीक्षा जैवतंत्रज्ञान, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूविज्ञान, गणित, गणितीय सांख्यिकी आणि भौतिकशास्त्र या सात विषयांसाठी घेतली जाईल. प्रश्नपत्रिकेत MCQ, MSQ, आणि संख्यात्मक प्रकार (NAT) प्रश्न असतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo