'बीएड सीईटी'चा अर्ज भरताना होऊ शकतो गोंधळ ; तीन स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा 

'बीएड सीईटी'चा अर्ज भरताना होऊ शकतो गोंधळ ; तीन स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Test Cell) उच्च शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या बीए /बीएस्सी, बीएड, बीएड-एमएड या अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. मात्र, हे तीनही  स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांची शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम व शैक्षणिक कालावधी सुद्धा वेगवेगळे आहेत. त्याचप्रमाणे या तीनही अभ्यासक्रमासाठी तीन स्वतंत्र ऑनलाइन सीईटी घेतल्या जाणार आहेत.त्यामुळे या परीक्षांचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे करण्यात आले आहे. BED (2Yr. RegularCourse) , BED-MED (3Yr.Int.Course) and Ba/BScBEd (4Yr. Int.Course )

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन शिक्षण क्षेत्रात येण्याचा विचार करणाऱ्या उमेदवारांना सीईटी परीक्षा दिल्याशिवाय बीएड अभ्यासक्रम प्रवेश मिळत नाही. मात्र,बीएडचे तीन स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत.त्यामुळे कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : स्पर्धा परीक्षा UPSC, MPSC चे टॉपरच तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत ; 500 उमेदवारांची यादीच तयार

बीए / बीएस्सी हा अभ्यासक्रम चार वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला इयत्ता बारावी मध्ये किमान 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे. तसेच मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्याला ४५ टक्के गुण असणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा २ मे रोजी घेतली जाण्याची शक्यता आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यात ३, नाशिक जिल्ह्यात २ , कोल्हापूर जिल्ह्यात २ अशी एकूण ७ महाविद्यालये आहेत.

बीएड-एम.एड. हा तीन वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स असून या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा दोन मार्च रोजी घेतली जाऊ शकते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षण विभागात प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचे केवळ एक महाविद्यालय उपलब्ध आहे.

दोन वर्षाच्या बीएड अभ्यासक्रमाची राज्यात एकूण 477 महाविद्यालय उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा ३ मार्च ते 6 मार्च या कालावधीत घेतली जाण्याची शक्यता आहे. सर्व अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन राज्य सामायिक परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी केली आहे.