नवीन नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्वाची!

राज्याचा उच्च शिक्षण व तंत्रज्ञान विभाग, मुंबई आयआयटी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने स्वायत्त महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रा. सोहोनी बोलत होते.

नवीन नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्वाची!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

समाजाच्या गरजा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रश्नांचा अभ्यास करून तो शासनापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकेल. त्यासाठी विद्यापीठांची (Universities) भूमिका महत्त्वाची असल्याचे मत आयआयटी  मुंबईतील (IIT Bombay) प्राध्यापक मिलिंद सोहोनी (Prof. Milind Sohoni) यांनी व्यक्त केले.

 

राज्याचा उच्च शिक्षण व तंत्रज्ञान विभाग, मुंबई आयआयटी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने स्वायत्त महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रा. सोहोनी बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अजित बाविस्कर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

इस्त्रायल-हमास युध्द : आयआयटी मुंबईत पडसाद, प्राध्यापकाविरुध्द विद्यार्थ्यांची पोलिसात धाव

 

सोहोनी म्हणाले, वर्गातील अभ्यास आणि विकासाचे ठोस प्रश्न यातील अंतर वाढले आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करण्यात आले होते. नव्याने विचार करून मूलभूत अभ्यासक्रम आणि अध्यापनाची पद्धत बदलणे आवश्यक आहे.

 

शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, ‘ग्रामीण भागात फिल्ड प्रकल्प कठीण आहे. परंतु समाजाचा प्रतिबद्धतेतून प्रश्न सोडवता येतील. त्यासाठी आंतर विद्याशाखीय आणि बहु विद्याशाखीय पद्धत उपयुक्त ठरू शकेल.’ विकास रस्तोगी म्हणाले,  ‘समाजासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्प आधारित अध्ययन आणि बहु विद्याशाखीय पद्धत वापरता करता येईल. समस्या निवारण करणाऱ्या समितीत बहु विद्याशाखेचे विद्यार्थी असणे आवश्यक आहे. त्यासाठी आयआयटी मुंबई निशुल्क कार्यशाळा घेत आहे.’

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO