शिक्षकांच्या वेतनात होणार वाढ
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्याबाबत नोटिफिकेशन फॉर शेड्युल 'सी' प्रमाणे हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्याबाबत नोटिफिकेशन फॉर शेड्युल 'सी' प्रमाणे हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. याबाबत कोणीही हरकती न घेतल्यास सुधारित वेतनश्रेण्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनातर्फे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली असून त्याबाबतची आधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही आधिसूचना शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याबाबत येत्या २ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. दिलेल्या मुदतीत कोणीही हरकत घेतली नाही. तर येत्या 3 एप्रिलपासून सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. प्राप्त होणाऱ्या हरकतीवर शासन चर्चेसाठी तयार आहे. त्यामुळे सर्वांनी हरकती नोंदवाव्यात, असे शासनाने स्पष्ट असल्याचे मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले..
eduvarta@gmail.com