देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू होणार स्वदेशी खेळांचा 'फिट इंडिया' सप्ताह

या कालावधीत, पालक-शिक्षक संमेलन, फिट इंडिया प्रतिज्ञा, योग, ध्यान, वार्षिक खेळ, निबंध लेखन यासह इतर कार्यक्रम आयोजित केले जातील.

देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू होणार स्वदेशी खेळांचा 'फिट इंडिया' सप्ताह
Fit India Week

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये येत्या १५ नोव्हेंबरपासून ‘फिट इंडिया’ सप्ताह (Fit India Week) साजरा करण्यात येणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना या सप्ताहात स्वदेशी खेळ खेळायचे आहेत, अशा स्वरूपाचे पत्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात सर्व शाळा आणि उच्च शैक्षणिक संस्थांना पाठवले आहे. 

 

दि. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत 'फिट इंडिया' सप्ताह साजरा केला जाईल, असे या पत्रात लिहिले आहे. शाळा त्यांच्या सोयीनुसार पाच ते सहा दिवस किंवा एक आठवडा या एका महिन्याच्या कार्यक्रमातून निवडू शकतात. या कालावधीत, पालक-शिक्षक संमेलन, फिट इंडिया प्रतिज्ञा, योग, ध्यान, वार्षिक खेळ, निबंध लेखन यासह इतर कार्यक्रम आयोजित केले जातील.

पीआरएन अनब्लॉक प्रकरणी ठगांनी उकळले पैसे; विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

 

यंदा  फिट इंडिया सप्ताहाची ही पाचवी आवृत्ती असेल.  याअंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील. ज्यामध्ये प्रश्नमंजुषा, निबंध, लेख, चित्रकला, पारंपारिक आणि स्थानिक खेळ, योग, नृत्य आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे.  यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नोंदणीकृत शाळांना डिजिटल प्रमाणपत्रही मिळणार आहे.

 

विद्यार्थ्यांना त्यांच्या देशाच्या मातीशी जोडण्यासाठी ‘फिट इंडिया’ मोहिमेत भारतातील १९ देशी खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कबड्डी, कुस्ती, खो-खो,  कलारीपयट्टू, (दक्षिण भरताचा पारंपरिक खेळ प्रकार) टग ऑफ वॉर, मलखांब  हेक्को (नागालँड), स्काय (काश्मीर), छाऊ आणि पायका आखाडा (मार्शल आर्ट्स आणि सेमी-क्लासिकलची त्यांची स्वतःची आवृत्ती), कबड्डी, थांग-ता (मणिपूरच्या स्वदेशी मार्शल आर्ट्स), नेमबाजी बॉल, लगोरी आणि लंगडी, गतका, रोल बॉल, धूप आणि कौडी खेळ, सिलंबम, गिली दांडा आदी खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO