SPPU News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची दिवाळीची सुट्टी जाहीर, सलग दहा दिवस विद्यापीठ बंद

शुक्रवारी धनत्रयोदशी निमित्त शासकीय सुट्टी, शनिवारी विद्यापीठात आयोजित जी-२० परिषदेच्या वेळेची पर्यायी सुट्टी, रविवारची नियमित सुट्टी, सोमवारी विद्यापीठात आयोजित जी-२० परिषदेच्या वेळेची पर्यायी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

SPPU News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची दिवाळीची सुट्टी जाहीर, सलग दहा दिवस विद्यापीठ बंद
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (SPPU) दिवाळीनिमित्त (Diwali Holiday) शुक्रवारपासून (ता.१०) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज बंद राहणार आहे.

 

दिवाळीच्या सणानिमित्त सरकारी, निमसरकारी कार्यालयांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी धनत्रयोदशी निमित्त शासकीय सुट्टी, शनिवारी विद्यापीठात आयोजित जी-२० परिषदेच्या वेळेची पर्यायी सुट्टी, रविवारची नियमित सुट्टी, सोमवारी विद्यापीठात आयोजित जी-२० परिषदेच्या वेळेची पर्यायी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पीआरएन अनब्लॉक प्रकरणी ठगांनी उकळले पैसे; विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

 

मंगळवारी बलिप्रतिपदेनिमित्त शासकीय सुट्टी, बुधवारी भाऊबीजेनिमित्त शासकीय सुट्टी, गुरुवारी विद्यापीठाच्या पदवीपद्रान सोहळ्याच्या वेळची पर्यायी सुट्टी, शुक्रवारी विद्यापीठाच्या अधिसभेच्या वेळेची पर्यायी सुट्टी असणार आहे.

 

तसेच तिसरा शनिवार असल्यामुळे विद्यापीठाची नियमित सुट्टी आणि रविवारची सुट्टी मिळून कर्मचाऱ्यांना १० दिवस सुट्टी आहे. दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारपासून (ता.२०) विद्यापीठातील कार्यालयांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO