इस्त्रायल-हमास युध्द : आयआयटी मुंबईत पडसाद, प्राध्यापकाविरुध्द विद्यार्थ्यांची पोलिसात धाव

विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत मानवता आणि सामाजिक विज्ञान विभागाच्या (एचएसएस) प्राध्यापक शर्मिष्ठा साहा आणि ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या संभाषणासाठी अतिथी वक्ता सुधन्वा देशपांडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

इस्त्रायल-हमास युध्द : आयआयटी मुंबईत पडसाद, प्राध्यापकाविरुध्द विद्यार्थ्यांची पोलिसात धाव

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) मुंबईच्या  विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल लेक्चर दरम्यान पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ बोलल्याप्रकरणी महिला प्राध्यापक आणि पाहुण्या वक्त्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Israel Hamas war) 

विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत मानवता आणि सामाजिक विज्ञान विभागाच्या (एचएसएस) प्राध्यापक शर्मिष्ठा साहा आणि ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या संभाषणासाठी अतिथी वक्ता सुधन्वा देशपांडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

अतिरिक्त शुल्क आकारणीला चाप; व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क प्राधिकरणाकडून नियमावली

विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, " सुधन्वा देशपांडे यांनी आपल्या लेक्चर दरम्यान पॅलेस्टिनी दहशतवादी झकारिया झुबैदीचा गौरव केला आहे. याचा संस्थेच्या अखंडतेवर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर विपरीत परिणाम  होतील."

सहाने यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या कामाचा भाग म्हणून देशपांडे यांना  आमंत्रित करण्यासाठी अयोग्यरित्या आपल्या पदाचा वापर केला आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. "पॅलेस्टाईनचा लढा हा एक स्वातंत्र्याचा लढा आहे आणि जगाच्या इतिहासात, वसाहतवादाच्या इतिहासात असा संघर्ष कधीही झालेला नाही, जो पूर्णपणे अहिंसक असेल," असे विधान देशपांडे यांनी आपल्या लेक्चर दरम्यान केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO