जिल्हा परिषदेसह अनुदानित व सेल्फ फायनान्सच्या 24 शाळा पडल्या बंद

सणसवाडी करंदी खुर्द, वेल्हा येथील  जिल्हा परिषद शाळा पिशवी व कारंवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या शून्य आहे.

जिल्हा परिषदेसह अनुदानित व  सेल्फ फायनान्सच्या 24 शाळा पडल्या बंद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील बंद पडणाऱ्या शाळांची(Closing schools)संख्या दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यात जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित व स्वयंअर्थसाहित शाळांचा (Private aided and self-financing schools with Zilla Parishad) समावेश आहे. वर्षा अखेरीस तब्बल 24 शाळा या शून्य पटाच्या (24 schools with zero student)असल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी यापूर्वीच शून्य पटाच्या शाळांची नावे यु-डायस पोर्टलवरून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सणसवाडी करंदी खुर्द, वेल्हा येथील  जिल्हा परिषद शाळा पिशवी व कारंवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या शून्य आहे. तर १३ स्वयम अर्थसाहित शाळा बंद पडल्या असून जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार या शाळांमध्ये शून्य विद्यार्थी आहेत. तर सहा खाजगी अनुदानित शाळा बंद झाल्या आहेत तर एक खाजगी विनाअनुदानित शाळा बंद पडली आहे.

हेही वाचा : तब्बल पाच लाख विद्यार्थी यु-डायस प्लसच्या बाहेर ; नोंदणीस उरले दोन दिवस , राज्याच्या निधीवर होणार परिणाम

काही दिवसांपूर्वी शून्य विद्यार्थी संख्या असणाऱ्या 16 शाळांची यादी 'एज्युवार्ता'ने प्रसिद्ध केली होती. आता या यादीत भर पडली असून एकूण 24 शाळांमध्ये शून्य विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. यात काही नामांकित शैक्षणिक संस्थांच्या शाळांची नावे आहेत. दरम्यान,विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक यु-डायस पोर्टलवर अपलोड करून घेण्याचे काम शाळांवर सोपविण्यात आले आहे. मात्र, काही पालक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड देत नसल्यामुळे शाळांना या विद्यार्थ्यांची नोंदणी करता येत नाही, असेही बोलले जात आहे.

---------------------------

"जिल्ह्यातील काही शाळांची पट संख्या शून्य दिसत असली तरी या शाळांची तपासणी केली जाईल. मुख्याध्यापक किंवा संस्थात्मक पातळीवरील काही कारणांमुळे विद्यार्थी नोंदणीचे काम राहिले असेल तर ते पूर्ण करून घेतले जाईल. मात्र, खरंच शून्य पट असेल तर संबंधित शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल. "

कामलाकांत म्हत्रे , माध्यमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे 

पुणे जिल्ह्यातील शून्य पटसंख्या असणाऱ्या शाळांची यादी 

1 )सनसवाडी करंदी खुर्द जिल्हा परिषद शाळा, भोर

2)सोनाई इंग्लिश मीडियम स्कूल ,हवेली

3)सर सर अकॅडमी, हवेली

4)जी एच रायसोनी पब्लिक स्कूल वाघोली , हवेली

5)उमाबाई दाभाडे प्री विद्यामंदिर, हवेली

6)पुष्पादेवी दुगड प्रायमरी स्कूल ,हवेली

7)जय गणेश प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, हवेली

8)डी व्ही जे इंटरनॅशनल स्कूल, खेड 

9)गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल, खेड

10)संजय शेठ जैध पाटील विद्यावर्धिनी प्रशाला, खेड

11)द न्यू एज स्कूल, मुळशी

12)पलांडे जुनिअर कॉलेज, शिरूर

13)पिशवी जिल्हा परिषद शाळा, वेल्हे

14)कारंवाडी जिल्हा परिषद शाळा, वेल्हे 

15)महात्मा फुले जुनियर कॉलेज, औंध

16)गोरा कुंभार हायस्कूल ,औंध

17)बी टी शहानी नवीन हिंद प्रायमरी स्कूल, येरवडा

18)सरस्वती विद्यालय, बिबेवाडी

19)हसन हुसैन इमामिया उर्दू हायस्कूल, हडपसर

20)नूतन समर्थ विद्यालय ,पुणे शहर

21)शेठ आर एन शहा इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल ,पुणे शहर

22)कमला नेहरू प्री स्कूल ,आकुर्डी

23)ज्ञानज्योती विकासनगर ,आकुर्डी

24) डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल च-होली, आकुर्डी