तब्बल पाच लाख विद्यार्थी यु-डायस प्लसच्या बाहेर ; नोंदणीस उरले दोन दिवस , राज्याच्या निधीवर होणार परिणाम 

4 लाख 98 हजार 888 विद्यार्थ्यांची माहिती वर्ग करण्याचे काम प्रलंबित आहे.

तब्बल पाच लाख विद्यार्थी यु-डायस प्लसच्या बाहेर ; नोंदणीस उरले दोन दिवस , राज्याच्या निधीवर होणार परिणाम 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची यु-डायस 9 (U-Dias) प्रणालीवरील माहिती यु-डायस प्लस (U-Dias Plus)प्रणालीवर वर्ग करण्याची कार्यवाही येत्या 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र अजूनही तब्बल 4 लाख 98 हजार 888 विद्यार्थ्यांची माहिती वर्ग करण्याचे काम प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्याला प्राप्त होणाऱ्या निधीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे याबाबत दोषी असणाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे,असे राज्याचे माध्यमिक उच्च शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचली का : 'एजुकेशनल ट्रिप' मध्ये मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्याचा रोमँटिक फोटोशूट व्हायरल

यु-डायस प्रणालीवरील राज्यातील 1 लाख 8 हजार 326 शाळांमधील 2 कोटी 8 लाख 76 हजार 625 विद्यार्थ्यांपैकी 2 कोटी 3 लाख 77 हजार 737 विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणाली मध्ये वर्ग करण्यात आले असून अजूनही 4 लाख 98 हजार 888 विद्यार्थ्यांची माहिती वर्ग करण्याचे काम प्रलंबित आहे. यु-डायस प्लस प्रणालीवरील शासकीय 75 हजार 130,  खाजगी अनुदानित 1 लाख 55 हजार 423 , खाजगी विनाअनुदानित 38 हजार 785 , स्वयंअर्थसहायित 2 लाख 23 हजार 440 व अनधिकृत 6 हजार 137 विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर अद्याप वर्ग करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : शिक्षक भरती : गणित विषयाच्या जागा रिक्ताच राहणार ; इतर विषयाच्या जागांचे काय होणार ?

राज्यातील 100% शाळांची माहिती यु-डायस प्रणालीवर वर्ग करणे आवश्यक आहे. 31 डिसेंबर नंतर याबाबतचे काम करता येणार नाही तसेच 30 व 31 डिसेंबर रोजी अनुक्रमे शनिवार व रविवारची सुट्टी आहे. मात्र सुट्टीच्या दिवशी सुद्धा नियोजन करून माहिती वर्ग करण्यासंदर्भात दक्षता घ्यावी. ही माहिती वर्ग न झाल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.