देशभरात खाजगी विद्यापीठांची संख्या वाढली ; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर 

गेल्या पाच वर्षांत गुजरातमध्ये २८ तर महाराष्ट्रात १५ खासगी विद्यापीठे स्थापन झाली आहेत.

देशभरात खाजगी विद्यापीठांची संख्या वाढली ; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशात खासगी व परदेशी विद्यापीठांच्या (Private and foreign universities in the country) स्थापनेला प्रोत्साहन दिले जात आहे.त्यामुळे गेल्या पाच वर्षात देशभरात एकूण १४० खाजगी विद्यापीठे स्थापन झाली आहेत.त्यात सर्वाधिक विद्यापीठाने गुजरात (Gujarat)स्थापना झाली असून दूसरा क्रमांकावर महाराष्ट्र असून त्यानंतर मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) क्रमांक लागतो.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

गेल्या पाच वर्षांत गुजरातमध्ये २८ तर महाराष्ट्रात १५ खासगी विद्यापीठे स्थापन झाली आहेत.मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १४ आणि १० विद्यापीठे स्थापन करण्यात आली आहेत.तसेच छत्तीसगडमध्ये ७  खासगी विद्यापीठे झारखंड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी सहा विद्यापीठे स्थापन झाली. बिहार, ओडिशा, उत्तराखंड आणि तेलंगणा येथे प्रत्येकी पाच विद्यापीठे स्थापन करण्यात आली, तर आंध्र प्रदेश, हरियाणा, मणिपूर, ओडिशा, तामिळनाडू, सिक्कीम आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी चार विद्यापीठे स्थापन करण्यात आली आहेत. तर २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात सर्वाधिक ४० खासगी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली, तर २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात ३४ विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.

हेही वाचा : बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशीप परीक्षेत गोंधळ; परीक्षा रद्द करण्याची मागणी

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील विद्यापीठांच्या यादीत या खाजगी विद्यापीठांची नावे समाविष्ट केली आहेत.खाजगी विद्यापीठांची स्थापना संबंधित राज्य विधानसभेने पारित केलेल्या कायद्याद्वारे आणि संबंधित राज्य सरकारने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेद्वारे केली जाते,अशा खाजगी विद्यापीठांना यूजीसीच्या विशिष्ट मंजुरीशिवाय सामान्य पदवी कार्यक्रम ऑफर करण्याचा अधिकार आहे. तथापि, व्यावसायिक आणि वैद्यकीय कार्यक्रम चालवण्यासाठी संबंधित नियामक किंवा वैधानिक संस्था जसे की ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, नॅशनल मेडिकल कमिशन आणि डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून मान्यता आवश्यक असते.