स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिली होती पोलिसांना माहिती; वन विभागाची भरती परीक्षा थांबविण्याची मागणी

वन विभागाच्या सर्व परीक्षा तत्काळ थांबविण्यात याव्या, नवीन वेळापत्रकानुसार सर्व परीक्षा फक्त TCS ION परीक्षा केंद्रांवर घेण्यात याव्यात, अशा मागण्या समन्वय समितीने केल्या आहेत.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिली होती पोलिसांना माहिती; वन विभागाची भरती परीक्षा थांबविण्याची मागणी
Forest Department Recruitmnet

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वन विभागाच्या भरती परीक्षेत (Forest Department Recruitment Examination) गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर आता या परीक्षेच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. सर्व परीक्षा सुरळीत पार पडणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पुढील परीक्षांमध्ये असा प्रकार घडू शकतो, अशी भीती व्यक्त करत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने भरती प्रक्रिया थांबवून परीक्षा रद्द करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. तसेच परीक्षा फक्त अधिकृत TCS ION केंद्रांवरच घेण्यात यावी, अशी विनंतीही केली आहे. (competitive examination coordination committee)

समन्वय समितीकडून वन विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये वन विभागाच्या सर्व परीक्षा तत्काळ थांबविण्यात याव्या, नवीन वेळापत्रकानुसार सर्व परीक्षा फक्त TCS ION परीक्षा केंद्रांवर घेण्यात याव्यात, खासगी देण्यात येऊ नये आणि लेखापाल पदाचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्याने झालेला पेपर रद्द करून पुन्हा घेण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

वन विभाग भरती घोटाळा : उत्तरांसाठी दहा लाख, प्रश्नपत्रिकेचे १११ फोटो, करिअर अकादमीचाच हात

पोलिसांना आधीच दिली होती माहिती

समितीने निवेदनात म्हटले आहे की, परिक्षांमध्ये काही टोळ्यांकडून परीक्षा केंद्र मैनेज करण्यात येणार आहेत व हाय टेक ब्लूटूथ आणि कॅमेऱ्याचा वापर करून गैरप्रकार करण्यात येणार असल्याचे आम्हाला आमच्या सूत्रांकडून माहिती पडले होते, परीक्षा केंद्राचे नाव, गैरप्रकार करणाऱ्यांची नावे आणि काही संशयित उमेदवारांची नावेही आम्हाला माहिती पडले होते. ही माहिती आम्ही त्या परीक्षा केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षकांना परीक्षेच्या एक दिवस आधीच दिली होती. परीक्षेच्या आधीच आम्ही वन विभाग वन मंत्र्यांना गैरप्रकार घडू शकतात म्हणून परीक्षा फक्त अधिकृत TCS ION केंद्रांवर घ्यायी असा इशारा दिला होता, असे समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘महाज्योती’ची परीक्षा वादात; खासगी क्लासचीच प्रश्नपत्रिका दिल्याचा आरोप, खुलासा मागवला

वन विभागाच्या लेखापाल पदाचा पेपर फुटला असून तो किती व्यक्तींपर्यंत पोचला असेल हे कोणालाही माहिती नाही त्यामुळे ती परीक्षा तत्काळ रद्द करण्यात यावी. येणाऱ्या पदांच्या परीक्षा पारदर्शक होतील किंवा नाही याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या परीक्षा तत्काळ थांबविण्यात याव्या. किती खासगी परीक्षा केंद्रांवर असे प्रकार घडले असतील हे अजून स्पष्ट नाही. त्यामुळे वन विभागाची पदभरती तत्काळ थांबविण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

TCS ची ION परीक्षा केंद्रे सुसज्ज अशी असून प्रत्येक प्रशासकीय विभागात एकतरी केंद्र उपलब्ध आहे. आमच्या माहितीप्रमाणे TCS ION परीक्षा केंद्रांवर एक दिवसात तीन शिफ्ट मध्ये ४० ते ५० हजार उमेदवारांची परीक्षा घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे TCS सोबत याबाबत तत्काळ बैठक घेण्यात यावी व फक्त TCS ION केंद्रावर परीक्षा घेण्यात यावी. परीक्षा घेताना मोबाईल जॅमर, पोलीस बंदोबस्त, कठोर फ्रीस्किंग बंधनकारक करण्यात यावी. लाखो उमेदवारांचे भविष्य आपण दुर्लक्ष केल्याने अंधारात जात आहे त्यामुळे आतातरी आमच्या मागण्या मान्य करून प्रामाणिक उमेदवारांना न्याय द्यावा, अशी विनंती समितीने केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD