MPSC Result : कर सहायक, लिपिक-टंकलेखक पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड याद्या व सर्वसाधारण गुणवत्ता याद्या या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या आहे.

MPSC Result : कर सहायक, लिपिक-टंकलेखक पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
MPSC Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) गुरूवारी महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) (Clerk-Typist) व कर सहायक (Tax Assistant) या संवर्गाचा निकाल (MPSC Result) जाहीर करण्यात आला आहे. या संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या (Merit List) व तात्पुरत्या निवड याद्या (Selection List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्याआधारे उमेदवारांकडून भरती (Recruitment) प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प मागविण्यात आला आहे.

 

प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड याद्या व सर्वसाधारण गुणवत्ता याद्या या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या आहे. उमेदवारांच्या अर्जामधील आरक्षणविषयक व इतर दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापुर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो. आयोगामार्फत घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच (दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ उमेदवार वगळता) या सर्वसाधारण याद्या व निवड याद्यांमध्ये समावेश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुण्यात उद्या ‘आक्रोश’

 

लिपिक-टंकलेखक पदाच्या निकालामध्ये मराठीच्या तात्पुरत्या निवड यादीत ५१० उमेदवारांची तर इंग्रजीच्या निवड यादीत १७ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. तर एकूण १ हजार ७ जणांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. कर सहायक पदासाठी ८२७ जणांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तर निवड यादीमध्ये ४७६ जणांचा समावेश करण्यात आला आहे.

 

दरम्यान, या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनूमध्ये ‘Post Preference/opting Out’ वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही लिंक दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून दि. २१ सप्टेबंर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. बाहेर पडण्याच्या विकल्पाआधारे अंतिम निकाल व शिफारशींसदर्भात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j