सामायिक कायदा प्रवेश परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर

या प्रवेश परीक्षेत १ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सीएलएटी यूजी निकाल आणि पीजी निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

सामायिक कायदा प्रवेश परीक्षा २०२४ चा  निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT Exam Result) चा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (Consortium of National Law Universities - NLUs) कडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी परीक्षा प्राधिकरणाच्या वेबसाइटवरून निकालाचे स्कोअर कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतात. 

३ डिसेंबर २०२३ रोजी सामायिक कायदा प्रवेश परीक्षा २०२४ प्रवेश परीक्षा (CLAT प्रवेश परीक्षा) आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. ज्या उमेदवारांना CLAT २०२४ अंतिम उत्तर की बद्दल तक्रारी आहेत ते तक्रारी नोंदवू शकतात. तक्रार पोर्टल येत्या ११ डिसेंबर  रोजी दुपारी १२ वाजता उघडेल. या प्रवेश परीक्षेत १ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सीएलएटी यूजी निकाल आणि पीजी निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. येत्या १२ ते २२ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

असा  तपासा CLAT २०२४ निकाल 

* प्रथम CLAT च्या अधिकृत वेबसाइट, consortiumofnlus.ac.in ला भेट द्या. 
* नंतर होम पेजवर CLAT निकाल डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
* आता अर्ज क्रमांक/प्रवेशपत्र क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा 
* त्यानंतर उमेदवाराच्या स्क्रीनवर CLAT 2024 चे स्कोअर कार्ड दिसेल.
* यानंतर उमेदवार निकाल डाउनलोड करू शकतात

------------