Savitribai Phule Pune University : आविष्कार संशोधन स्पर्धेची तारीख बदलली

विद्यापीठस्तर स्पर्धेसाठी पात्र संशोधन स्पर्धेच्या ठिकाणी संशोधन कोड देण्यात येणार आहेत

Savitribai Phule Pune University : आविष्कार संशोधन स्पर्धेची तारीख बदलली
Savitribai Phule Pune University News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Savitribai Phule Pune University News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संशोधन स्पर्धा (आविष्कार, अन्वेषन, इनोव्हेशन परिषद) उपक्रमाची तारीख विद्यापीठाच्या वतीने बदलण्यात आली आहे. 15 डिसेंबर ऐवजी आता 20 डिसेंबरला ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय स्तरांवर निवडलेल्या संशोधन स्पर्धकांनी विद्यापीठस्तर संशोधन स्पर्धेसाठी बुधवारी (ता. २० डिसेंबर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) खाशाबा जाधव कीडा संकुल (Khashaba Jadhav Sports Complex )येथे उपस्थित राहावे, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

विद्यापीठस्तर स्पर्धेसाठी निवडलेल्या संशोधन प्रकल्पांचे संशोधन स्पर्धेत नमुद वेळापत्रक आणि मार्गदर्शक सुचनांनुसार Poster (1M x1M) Flex poster & Model presentation) साठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी खाशाबा जाधव कीडा संकुल येथे सकाळी ०९.०० वाजता उपस्थित रहावे.

हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोण? १९ डिसेंबरला मुलाखती; अंतिम पाच ठरले

संशोधन स्पर्धेत फक्त विद्यापीठस्तर स्पर्धेसाठी निवडलेल्या सहा विद्याशाखांच्या UG/PG/PPG च्या प्रत्येक प्रकल्पासाठी फक्त एकाच संशोधक विद्यार्थ्याने आपला 
संशोधन प्रकल्प सादर करावा. संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण (1M x1M) साईजचे फ्लेक्स पोस्टर आणि मॉडेल सादर करावेत. संशोधन विद्यार्थ्याने पोस्टरवर स्वतःचे नाव/ महाविद्यालयाचे नाव /विद्यापीठाचे नाव अथवा कोणत्याही ओळख चिन्हांचा वापर करू नये.

विद्यापीठस्तर स्पर्धेसाठी पात्र संशोधन स्पर्धेच्या ठिकाणी संशोधन कोड देण्यात येणार आहेत. विद्यापीठाने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकामध्ये निवड करण्यात आलेल्या संशोधक विद्यार्थ्यानेच फक्त सदर स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राचार्य / शिक्षक/ पालक किंवा संशोधन समन्वयकांनी संशोधन सादरीकरणाच्या ठिकाणी उपस्थित राहू नये, अशा सूचना विद्यापीठाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा : NCERT BOOK : एनसीईआरटीच्या पुस्तकातून 'इंडिया' नाव वगळणार का ? शिक्षण मंत्रालयाचे स्पष्टीकरण...

संशोधक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. विद्यापीठस्तर स्पर्धेसाठी निवडलेल्या संशोधक स्पर्धकांची यादी विद्यापीठाच्या परिपत्रकासोबत प्रसिध्द करण्यात येणार आहे. निवडलेल्या संशोधक स्पर्धकांना सूचित करण्याची संपूर्ण जबाबदारी संबधित महाविद्यालयांच्या समन्वयकांची (ARC) असणार आहे. विद्यापीठस्तर स्पर्धेमध्ये संशोधक स्पर्धक निवडण्याचे संपूर्ण अधिकार हे संचालक, अंतर्गत गुणवत्ता सिध्दता कक्ष यांचे असल्यामुळे कोणताही हस्तक्षेप अथवा तक्रार विचारात घेतली जाणार नाही, असेही विद्यापीठाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.