वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; NEET च्या अर्ज शुल्कात कपात 

प्रत्येक संवर्गांसाठी अर्ज शुल्क 750 रुपयांनी कमी केले आहे. 

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; NEET च्या अर्ज शुल्कात कपात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET PG परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG परीक्षेला बसणाऱ्या लाखो उमेदवारांचे परीक्षा शुल्क कमी केले आहे. प्रत्येक संवर्गांसाठी अर्ज शुल्क 750 रुपयांनी कमी केले आहे. 

NBEMS ने 1 जानेवारी 2024 पासून  प्रत्येक संवर्गातील अर्जदारांसाठी 750 रुपये शुल्क कमी केले आहेत. सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 2021 मध्ये 4250 रुपये करण्यात आले होते.  आता 1 जानेवारी 2024 पासून 3500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर  SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क  2021 मध्ये 3250 रुपये करण्यात आले होते. आता ते 2500 रुपये करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे सुमारे 10 वर्षानंतर म्हणजे 2013 नंतर आता 2024 मध्ये हे शुल्क कमी करण्यात आले आहे. 2013 मध्ये, खुल्या आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 3750 रुपये होते, ते 2021 मध्ये 4250 रुपये करण्यात आले होते. 2013 मध्ये, SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 2720 रुपये होते, ते 2021 मध्ये 3250 रुपये करण्यात आले होते.  NEET-PG ही पात्रता-सह-रँकिंग परीक्षा आहे जी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा, 2019 अंतर्गत विविध MD/MS आणि PG डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकल प्रवेश परीक्षा म्हणून घेतली जाते.