JEE मेन 2024 ची अंतिम 'उत्तर की 'प्रसिद्ध

NTA ने जेईई मेन 2024 च्या दुसऱ्या सत्रात पेपर 1 च्या परीक्षा 4, 5 , 6, 8 आणि 9 एप्रिल रोजी घेण्यात आल्या होत्या.  

JEE मेन 2024 ची अंतिम 'उत्तर की 'प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जेईई मेन एप्रिल 2024 (JEE Main April 2024)सत्रात बसलेल्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे . नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने एप्रिलमध्ये झालेल्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या JEE मेन 2024 च्या सत्र 2 च्या  पेपर 1 (BE/B.Tech) च्या अंतिम उत्तर की प्रसिद्ध केल्या आहेत. NTA ने jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईट वर अंतिम उत्तर की जाहीर (Announce the answer key)केली आहे.  

NTA ने जेईई मेन 2024 च्या दुसऱ्या सत्रात पेपर 1 च्या परीक्षा 4, 5 , 6, 8 आणि 9 एप्रिल रोजी घेण्यात आल्या होत्या.  यानंतर, एजन्सीने 12 एप्रिल रोजी उमेदवारांची तात्पुरती उत्तर की आणि उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली आणि 14 एप्रिलपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागवल्या. या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर, NTA ने आता अंतिम उत्तर की जारी केल्या आहेत.

NTA ने जेईई मेन एप्रिल 2024 पेपर 1 ची अंतिम उत्तर की जारी केल्यानंतर आता निकाल जाहीर केले जातील. एजन्सीने निकाल प्रसिध्द करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. तथापि, अंतिम उत्तर की जारी झाल्यानंतर NTA JEE मुख्य निकाल 1-2 दिवसांत जाहीर करू शकते.