विद्यापीठातील मुलीची छेड काढणाऱ्याची धिंड काढा ; रोहित पवार आक्रमक, विद्यार्थ्यांशी साधला संवाद 

मुलीची छेड काढणाऱ्याची धिंड काढायला हवी, असे मत व्यक्त करत रोहित पवार यांनी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

विद्यापीठातील मुलीची छेड काढणाऱ्याची धिंड काढा ; रोहित पवार आक्रमक, विद्यार्थ्यांशी साधला संवाद 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (savitribai phule pune university ) आवारात एका विद्यार्थिनीची छेड (harassed the students) काढण्याची घटना नुकतीच घडली. त्यावर पोलिसांकडे तक्रारही देण्यात आली. परंतु, संबंधित विद्यार्थिनीने काही दबावापोटी ही तक्रार मागे घेतली. ही बाब विद्यार्थ्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत मुलीची छेड काढणाऱ्याची धिंड काढायला हवी, असे मत व्यक्त करत विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

हेही वाचा : राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ प्रसिद्ध; सूचना,हरकती मागविल्या

विद्यापीठाचे आधिसभा सदस्य व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी दुपारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  एका मुलीची छेड  काढल्याची घटना नुकतीच घडली मात्र त्यातील दोषी व्यक्तीवर कारवाई झाली नसल्याचे विद्यार्थ्यांनी रोहित पवार यांना सांगितले. त्यावर विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थिनी सुरक्षितच असल्या पाहिजे, मुलीची छेड काढणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच या प्रकरणी विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुलीने तक्रार मागे घेतली असली तरी संबंधित मुलीने तिचे नाव समोर येऊ नये, या भीतीपोटी तक्रार मागे घेतली असावी, त्यामुळे सीसीटीव्ही चेक करून संबंधित व्यक्ती कोण आहे. याची चौकशी झालीच पाहिजे, असे खडसावून सांगितले.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचा प्रश्न, जेवणाचा प्रश्न सुटला पाहिजे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाला पत्र देणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच कमवा व शिका योजनेच्या मानधनात शंभर रुपयांपर्यंत वाढ करण्याची मागणी करायला हवी, असेही पवार म्हणाले. त्याचप्रमाणे गवत काढणे, साफसफाई करणे या कामातून विद्यार्थ्यांना बाहेर काढून इतर कुशल कामे द्यायला हवीत, असेही मत व्यक्त केले.

संघर्ष यात्रेच्या निमित्ताने रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला.तसेच संघर्ष यात्रा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी स्वतः विद्यापीठात आंदोलन करण्यासाठी येईल. त्यावेळी केले जाणारे आंदोलन वेगळ्या प्रकारचे असेल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.