राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ प्रसिद्ध; सूचना,हरकती मागविल्या

शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, सर्व समाज घटकांना यावर आपले अभिप्राय येत्या २७ ऑक्टोबरपर्यंत नोंदवता येतील.

राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ प्रसिद्ध; सूचना,हरकती मागविल्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP)अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३  (पायाभूत स्तर) SCF चा मसुदा तयार करण्यात आला आहे. परिषदेच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर आराखडा उपलब्ध आहे. शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, सर्व समाज घटकांना यावर आपले अभिप्राय येत्या २७ ऑक्टोबर पर्यंत https://tinyurl.com/SCF-FS-Responses या लिंकवर नोंदवता येतील. तसेच scffsresponces@maa.ac.in येथे ईमेलवर सुध्दा आपले अभिप्राय पाठवता येणार आहेत. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या एनसीएफनंतर राज्य शासनाने एससीएफ प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वच "एससीएफ'ची वाट पाहत होते.अखेर परिषदेतर्फे राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार शालेय शिक्षणात मोठे बदल होणार आहेत.त्यामुळे येत्या २७ ऑक्टोबरपर्यंत शिक्षणाशी निगडित सर्व घटकांनी त्यावर सूचना व हरकती पाठवणे आवश्यक आहे.