वैद्यकीय महाविद्यालयांना एक चूक पडणार एक कोटीला; प्राध्यापक, डॉक्टरांवरही कारवाई

रुग्णांच्या नोंदीसह चुकीची घोषणा, कागदपत्रे, रेकॉर्ड सादर करणारे प्राध्यापक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, संचालक, डॉक्टर यांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे निर्देश NMC कडून जारी करण्यात आले आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयांना एक चूक पडणार एक कोटीला; प्राध्यापक, डॉक्टरांवरही कारवाई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) नियमावलीचे पालन न करणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयांवर (Medical College) आता मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एका चुकीसाठी एक कोटी रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच, रुग्णांच्या नोंदीसह चुकीची घोषणा, कागदपत्रे, रेकॉर्ड सादर करणारे प्राध्यापक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, संचालक, डॉक्टर यांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे निर्देश NMC कडून जारी करण्यात आले आहेत.

 

नियमांमध्ये असे नमूद केले आहे की, जर एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाने एनएमसीच्या संबंधित मंडळांनी घालून दिलेल्या वैधानिक तरतुदी आणि नियमांचे पालन केले नाही तर आयोग त्या महाविद्यालयाची पाच शैक्षणिक वर्षांपर्यंत मान्यता रोखू शकतो आणि मागेही घेऊ शकतो.

कंत्राटी तहसीलदार भरती रद्द करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश; आयुष प्रसाद यांच्याकडून मागविला खुलासा

 

नियमानुसार, अंडर-ग्रॅज्युएट मेडिकल एक्झामिनेशन बोर्ड (UGMEB), पोस्ट-ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड (PGMEB) किंवा NMC वर व्यक्ती किंवा एजन्सीद्वारे दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास वैद्यकीय संस्थेद्वारे सर्व अर्ज/विनंत्यांची प्रक्रिया लगेच थांबविली जाईल.

 

यामध्ये रुग्णांची विविधता, शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा तपासण्या, रेडिओलॉजिकल तपासण्या आणि इतर संबंधित तपासण्या, अवलंबलेल्या अध्यापन पद्धतीचे मूल्यमापन आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण प्रशिक्षण सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या मानकांशी संबंधित इतर बाबीही आहेत. विहित तरतुदींचे पालन न केल्यास आयोग इशारा देईल किंवा दंड आकारेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j