१० वी, १२ वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून तीन वेळा; ‘या’ राज्याने केली मोठी घोषणा

तीन परीक्षांमधील विद्यार्थ्याची सर्वोत्तम कामगिरी ही त्याची अंतिम कामगिरी मानली जाईल, अशी घोषणा कर्नाटक शिक्षण मंडळाने केली आहे.

१० वी, १२ वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून तीन वेळा; ‘या’ राज्याने केली मोठी घोषणा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नाकारत कर्नाटक सरकारने (Karnataka Government) राज्याचे नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणणार असल्याची घोषणा नुकतीच केली होती. यावरून बरेच राजकारण ही घडले होते. आता कर्नाटकच्या काँग्रेस (Congress) सरकारने राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु केली आहे. चालू शैक्षणिक वर्षांपासून राज्यात SSLC (१० वी ) आणि द्वितीय PUC (१२ वी ) च्या विद्यार्थ्यांना वर्षातून तीन वेळा बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल. (10th, 12th Board Examination)

तीन परीक्षांमधील विद्यार्थ्याची सर्वोत्तम कामगिरी ही त्याची अंतिम कामगिरी मानली जाईल, अशी घोषणा कर्नाटक शिक्षण मंडळाने केली आहे. यावर्षी १० वी ची पहिली बोर्ड  परीक्षा ३० मार्च ते १ एप्रिल दरम्यान, दुसरी  परीक्षा १२  ते १९ जून आणि तिसरी  परीक्षा २९ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान घेतली जाईल.

तीन वर्षांच्या आतील मुलांना शाळेत पाठविणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयाने टोचले पालकांचे कान

बारावीची पहिली बोर्ड परीक्षा  १ ते २५ मार्च दरम्यान होईल. तर दुसरी परीक्षा १५  मे ते ५ जून दरम्यान आणि तिसरी परीक्षा परीक्षा १२  ते ३० जुलै दरम्यान घेतली जाईल, असे बोर्डाकडून कळवण्यात आले आहे. सध्या १२ वी  परीक्षेत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी एखाद्या विषयात मिळालेल्या गुणांवर समाधानी नसेल, तर मुख्य परीक्षेत त्या विषयात मिळालेले गुण नाकारून पुन्हा पुरवणी परीक्षा देण्याचा पर्याय त्याच्याकडे होता. परंतु, पुरवणी परीक्षेत मिळालेले गुण हे त्या  विद्यार्थ्याचे अंतिम गुण मानले जात होते.  

नवीन परीक्षा पद्धतीमुळे तिन्ही  परीक्षेत मिळालेले सर्वोत्तम गुण कायम ठेवून गुण सुधारण्याची संधी मिळेल. तसेच मुख्य परीक्षा आणि पुरवणी परीक्षा या पूर्वीच्या परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि चिंता निर्माण होत होते. आता या नवीन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j