IAS च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना थेट दिल्लीतून मार्गदर्शन; चंद्रकांत पाटील यांची माहिती

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या जुन्या इमारतीत मदत केंद्र ही सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तेथे मार्गदर्शन वर्गही सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

IAS च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना थेट दिल्लीतून मार्गदर्शन; चंद्रकांत पाटील यांची माहिती
Cabinet Minister Chandrakant Patil

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) पूर्व प्रशिक्षण केंद्रांमधून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट दिल्लीतून (Delhi) मार्गदर्शन मिळणार आहे. दिल्लीतील अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी सर्व सहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.

अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राची पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. यूपीएससी परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना चांगले यश मिळावे, यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत.

धक्कादायक : दहावीत ७१ टक्के मिळूनही विद्यार्थिनीची आत्महत्या; एकीने नापास झाली म्हणून संपवले आयुष्य

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या जुन्या इमारतीत मदत केंद्र ही सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तेथे मार्गदर्शन वर्गही सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या वर्गाला दिल्ली येथील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन मिळू शकेल व त्याचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल, अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

टू वे व्हिडीओ यंत्रणा सर्व सहा केंद्रांना देण्यात आली आहे. त्यामाध्यातून केवळ अनुभवी प्राध्यापक केवळ मार्गदर्शनच करणार नाहीत, तर विद्यार्थीही त्यांच्याशी संवाद साधू शकतात. त्यांना सुचना करू शकतात. सध्या बार्टी, महाज्योती, सारथी अशा चारही बाजूने यूपीएससीमध्ये महाराष्ट्रचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo