11th Admission : अतिवृष्टीमुळे विशेष फेरीतील प्रवेशासाठी मुदतवाढ

तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्या असून सध्या पहिल्या विशेष फेरीची प्रक्रिया सुरू आहे. विशेष फेरीमध्ये सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

11th Admission : अतिवृष्टीमुळे विशेष फेरीतील प्रवेशासाठी मुदतवाढ
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Monsoon) शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता अकरावी प्रवेशात (11th Admission) अडचणी येत आहेत. यापार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने (Education Department) अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी चार दिवस मिळणार आहेत.

शिक्षण विभागाकडून राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. ११ वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत. याअंतर्गत तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्या असून सध्या पहिल्या विशेष फेरीची प्रक्रिया सुरू आहे.

11th Admission : विशेष फेरीची निवड यादी प्रसिध्द, २६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

पुण्यात विशेष फेरीमध्ये सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चितीसाठी दि. २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, सध्या राज्यात अतिवृष्टी होत असल्याने शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे विशेष फेरी -१ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुण्यातील अकरावी प्रवेशाची स्थिती

फेरी

निवड झालेले विद्यार्थी

प्रत्यक्ष प्रवेश

पहिली 

४२,२३२

२३,०९३

दुसरी

२०,६०२

९,१४४

तिसरी

१४,७०८

५,३१२

विशेष

२५,९७३

२०,७२१ (दु. १ पर्यंत)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD