राज्यसेवा परीक्षा २०२१ : पात्र २५० उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश

कागतपत्रे तपासणीसाठी उपस्थित २६३ उमेदवारांची एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम - ९ (सीपीटीपी - ९) अंतर्गत नियुक्तीच्या अनुषंगाने दि. ३ ते ७ जुलै या कालावधीमध्ये त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

राज्यसेवा परीक्षा २०२१ : पात्र २५० उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यसेवा परीक्षा २०२१ (State Service Exam 2021) च्या अंतिम निकालानुसार एकूण २६५ उमेदवार शिफारसप्राप्त ठरले होते. तर राज्यसेवा परीक्षा २०२० मधील यापूर्वी मुदतवाढ देण्यात आलेले सात उमेदवार तसेच एक गुणवत्ताधारक खेळाडू आणि नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे तीन पाल्य अशा एकूण २७६ उमेदवारांपैकी २६३ उमेदवार कागदपत्र तपासणीस उपस्थित होते. त्यापैकी २५० उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाने प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्तीचा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. (Maharashtra Government)

 

कागतपत्रे तपासणीसाठी उपस्थित २६३ उमेदवारांची एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम - ९ (सीपीटीपी - ९) अंतर्गत नियुक्तीच्या अनुषंगाने दि. ३ ते ७ जुलै या कालावधीमध्ये त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ उमेदवारांना पुढील तुकडीत हजर होण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

दत्तक शाळा योजनेचा जीआर आला; शाळेला नाव अन् ३ कोटींपर्यंतच्या वस्तुंची देणगी...

 

कागदपत्र पडताळणीअंती पात्र २५० उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी तसेच उमेदवारांच्या अन्य प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी संबंधित यंत्रणांकडून करण्यात आली आहे. ही तपासणी आणि प्रमाणपत्रे पडताळणीचे अहवाल विचारात घेऊन २५० उमेदवारांना दि. ३ ऑक्टोबरपासून दोन वर्षांच्या सीपीटीपी - ९ या तुकडीतील प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

 

नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, मुख्य़ाधिकारी, नायब तहसिलदार आणि सहायक प्रकल्प अधिकारी या पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j