संचारबंदी, इंटरनेट सेवा बंदमुळे विद्यार्थी हवालदिल; परीक्षेला मुकण्याची भीती, अर्जही भरता येईनात

मराठा आंदोलनास बीड जिल्ह्यात सोमवारी हिंसक वळण मिळाल्यानंतर संचारबंदी लागू केली आहे. जाळपोळीच्या घटनांचे अनेक व्हिडीओ, छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल होऊ लागल्याने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

संचारबंदी, इंटरनेट सेवा बंदमुळे विद्यार्थी हवालदिल; परीक्षेला मुकण्याची भीती, अर्जही भरता येईनात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

बीड जिल्ह्यासह (Beed District) इतर काही जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याने जिल्हा प्रशासनाकडून बीडमध्ये संचारबंदी लागू केली असून इंटरनेट (Internet) सेवाही बंद केली आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरता येत नाहीत. तसेच संचारबंदी कायम राहिल्यास दि. १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या परीक्षेला (ZP Exam) मुकण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे.

 

मराठा आंदोलनास बीड जिल्ह्यात सोमवारी हिंसक वळण मिळाल्यानंतर संचारबंदी लागू केली आहे. जाळपोळीच्या घटनांचे अनेक व्हिडीओ, छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल होऊ लागल्याने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. उद्या रात्रीपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. आंदोलकांनी थेट आमदारांच्या घरांना आग लावल्याने प्रशासनाकडून तातडीने ही पावले उचलण्यात आली आहेत.

JEE Main परीक्षेचा अभ्यासक्रम होणार कमी; लवकरच अधिसुचना जारी होण्याची शक्यता

 

दरम्यान,  MPSC गट-क सेवा मुख्य परीक्षा (लिपिक-टंकलेखक) पदाचे अर्ज भरण्याची आज (दि. ३१) शेवटची तारीख आहे. बीड आणि इतर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी अजूनही अर्ज भरलेले नाहीत, त्यात इंटरनेट सेवा ठप्प आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी किमान ३ ते ४ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून आयोगाला करण्यात आली आहे.

 

तर दि. १ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या भरतीची परीक्षा आहे. मंगळवारी बीडसह मराठवाड्यातील काही भागातील बससेवाही बंद करण्यात आली आहे. हीच स्थिती बुधवारीही (दि. १) कायम राहिल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. बीडमधील संचारबंदी कायम राहिल्यास परीक्षा होणार की नाही, याबाबतही संभ्रम वाढला आहे. त्यामुळे परीक्षेपासून मुकण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k